Breaking
ब्रेकिंग

भागीरथी माध्यमिक विद्यालयात वैजापुर येथील शाळेत अखेर १५ वर्षांनी गेट टुगेदर उत्साहात संपन्न 

0 8 9 7 0 5

भागीरथी माध्यमिक विद्यालयात वैजापुर येथील शाळेत अखेर १५ वर्षांनी गेट टुगेदर उत्साहात संपन्न 

राहुरी तालुका जावेद शेख

वैजापूर येथील भागीरथी माध्यमिक विद्यालय,नालेगाव ह्या शाळेतील २०१० ला इयत्ता १० वी ला असणारी बॅच १५ वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व मित्रांची स्नेह मेळाव्याने भेट घडून आली. ह्या विद्यालयातील आठवणी,शिक्षक,फळा,येथील परिसर हे सर्व बघून पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी यांच्या आठवणी नव्याने ताज्या झाल्यात, स्नेह मेळावा आयोजित करून सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री. बी. एम. हजारे सर व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पी. एन. पठारे सर व इतर शिक्षक वृंद प्रमोद चव्हाण सर,विभूते सर,रिंढे सर व परदेशी पाहुणे ,पठारे पाहुणे, तायडे मामा इत्यादी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक,संदीप त्रिभुवन,मोहित परदेशी,अर्चना परदेशी,सोनाली सु. काकडे, सोनाली ना. काकडे, योगेश नलावडे इत्यादि होते. तसेच या स्नेह मेळाव्यात कृष्णा सातपुते, अमोल शिंदे, संदीप शिंदे, रामहरी जाधव, लक्ष्मन गायकवाड, राजेश गांगे, गिरजिनाथ सोनवणे,अमोल त्रिभुवन,किशोर जादू, गणेश वैद्य, अक्षय जगताप तर निर्मला जारवाल, कला महेर, सोनिया त्रिभुवन, पल्लवी पठारे, कविता कुमावत, माधवी कुमावत, रुपाली शिंदे, मनीषा कुमावत इत्यादी मित्र मैत्रिणी कार्यक्रमला उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीत म्हणून सुरवात झाली. शिक्षक व विद्यार्थी यांनी सर्वानी मानाचा फेटा परिधान केला, तसेच प्रत्येक माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगताने खूप आठवणी जाग्या झाल्यात.या कार्यक्रमाचे आभार अमोल चोथे यांनी मानले तर सूत्रसंचलन संदीप दा. त्रिभुवन यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे