Breaking
ब्रेकिंग

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहसचिवपदी मुकेशजी मुळे यांची निवड

सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

0 8 6 6 5 5

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहसचिवपदी मुकेशजी मुळे यांची निवड

सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सहसचिवपदी माननीय मुकेशजी मुळे साहेब यांची निवड झाल्यानंतर बसपाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते भरत कानगुडे , संजय भिंगारदिवे यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या भेटी दरम्यान नारायणडोहो येथील श्री चांगदेव विद्यालयासंबंधी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विद्यालयातील पायाभूत सुविधा, शिक्षक व शैक्षणिक प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच पालक व समाजाशी संबंधित विषयांवर सविस्तर संवाद साधण्यात आला. त्याचबरोबर प्रशासनिक व शासकीय स्तरावरील समस्यांवरही विचारविनिमय झाला.

या सर्व चर्चेत माननीय मुकेशजी मुळे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्यांच्या निराकरणासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गावातील नागरिक, पालकवर्ग व शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्वांच्याच अपेक्षांना नवी दिशा मिळाली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे