Breaking
ब्रेकिंग

जीएस ढोरजकर गुरुजी फाउंडेशन संचलित साई इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पाल्याचा प्रवेश साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निश्चित करून घ्या 

0 3 9 0 2 9

जीएस ढोरजकर गुरुजी फाउंडेशन संचलित साई इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पाल्याचा प्रवेश साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निश्चित करून घ्या 

एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा

अहिल्यानगर : दि . २७ / जीएस ढोरजकर गुरुजी फाउंडेशन संचलीत साई इंग्लिश मीडियम नवनागापूर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन हर्ष उल्हासात व उत्साहात साजरे झाले. स्नेहसंमेलनात नर्सरी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी अत्यंत रोमहर्षक कला सादर करून उपस्थितांना आनंदीत केले .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आदरणीय बाबुशेठजी टायरवाले व एमआयडीसी पोलिस स्टेशन अहिल्यानगर येथील पोलीस निरीक्षक माननीय विनोदजी परदेशी साहेब उपस्थित होते. तसेच इंजी. राहुल पाटोळे, आदर्श ढोरजकर, माया पंडित /गिरवले शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता नेलवाल यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. शाळेच्या शिक्षिका कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मुलांनी विविध गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सांस्कृतिक आणि आधुनिक जगाचे मेळ घालून विठ्ठल भक्ती व इतर गाण्यावर ताल धरला होता. तर बॉलीवूडच्या धमाकेदार गीतांनी कार्यक्रमात रंग भरला. तसेच आपल्या भाषणातून चिमुकल्यांनी वक्तृत्वाचे कौशल्य देखील दाखवले.
याप्रसंगी पारितोषिक वितरण समारंभ ही उत्साहात झाले .

यावेळी आयोजन समितीने पुढील शैक्षणिक वर्ष 2025 / 26 साठी नवीन प्रवेश सुरू करण्यात आले असुन पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश साई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निश्चित करून घ्यावे असे आवाहन केले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे