Breaking
ब्रेकिंग

चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेच्या पाचव्या दिवशी 39 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

 5 वाहन चालकांनी त्यांची कागदपत्रे सादर न केल्याने सदर संशयास्पद 5वाहने पोलीस स्टेशनला जमा

0 3 9 0 8 3

चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेच्या पाचव्या दिवशी 39 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

 5 वाहन चालकांनी त्यांची कागदपत्रे सादर न केल्याने सदर संशयास्पद 5वाहने पोलीस स्टेशनला जमा

राहुरी  विशेष वृत्तसेवा / जावेद शेख

मोहिमेच्या पाच दिवसात एकूण 215 वाहनांवर विना नंबर प्लेटची कारवाई

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 30.12. 2024 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.
सदर मोहिमेदरम्यान 45 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. पैकी 39 वाहनांवर 19900 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्या गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या. उर्वरित नऊ गाड्यांची कागदपत्रे अद्याप पर्यंत सादर न केल्याने सदर गाड्यांच्या मालकी हक्काबाबत खात्री करून पुढील कारवाई करत आहोत.

राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल.

सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील , पोलीस हेड कॉन्स्टेबल गीते, ठोंबरे , फुलमाळी पो. कॉ.सतीश कुराडे ,अंकुश भोसले , जालिंदर धायगुडे होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.

नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे