Breaking
ब्रेकिंग

अडसूळ कॅम्पस च्या विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छ भारत अभियान

0 3 9 0 2 7

अडसूळ कॅम्पस च्या विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छ भारत अभियान

एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा

चास (जि .अहिल्यागर), ७ फेब्रूवारी: अडसूळ टेक्निकल कॅम्पस, अहिल्यानगर मधील सोशल सर्विस क्लब विभागामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चास या ठिकाणी दिनांक ०६ फेब्रूवारी २०२५ रोजी स्वच्छता अभियान घेण्यात आले. सर्वच विभागाचे विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी अल्पोपहार व इतर खाण्याच्या वस्तूचे वेस्टेज आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्या असा सर्व प्रकारचा कचरा यावेळी संबंधित परिसरात विखुरला गेलं होता. तो सर्व कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानासाठी सोशल सर्विस क्लबचे विभागप्रमुख प्रा. स्नेहिल गायकवाड आणि समिती सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभियानात अडसूळ टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.

अडसूळ टेक्निकल कॅम्पस चे डायरेक्टर आणि प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . त्यांनी उपस्थितांना या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. राष्ट्र उभारणीच्या कामात स्वच्छता अभियान महत्वाचे असून या अभियानाला लोक चळवळीचे, क्रांतीचे स्वरूप यावे आणि त्यात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका बजावावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली तसेच प्राचार्य पी.एम.पाटील यावेळी म्हणाले कि सार्वजनिक स्वच्छता हा सहजभाव असला पाहिजे. प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी, पाण्याचे प्रवाह आणि स्त्रोतांची स्वच्छता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेवर भर या गोष्टी नित्य सवयीचा भाग बनल्या पाहिजेत त्याबाबत जण जागृती आवश्यक आहे .

सदरील कार्यक्रमाचे संस्थेचे.चेअरमन मा.अनिरुद्ध माणिक आडसूळ, सेक्रेटरी लीनाताई आडसूळ, खजिनदार मा. परमेश्वर आडसूळ, संचालक कृष्णा आडसूळ, डायरेक्टर आणि प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील, अडसूळ कॉम्पुटर मॅनॅजमेण्ट इन्स्टिटयूट चे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे,साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संदेश वायाळ, अडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे, अडसूळ लॉ कॉलेज चे प्राचार्य प्रा. रियाझ बेग, , प्रशासन विभागाचे डीन रमेश गडाख, अडसूळ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे प्राचार्य डॉ. प्रदीप पंडित अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे डीन आणि इ&टीसी विभाग प्रमुख डॉ. दिनेश अडोकर, संगणक विभाग प्रमुख डॉ.खान एस.एस, प्रशाकीय विभागाचे आणि संशोधन विभागाचे डीन डॉ. हेमंत जाधव, प्रथम वर्ष शैक्षणिक विभागाचे डीन डॉ. ए.जे. शिर्के, डॉ.ए.डी.लोढे, डॉ. जी.आर भांड, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. अनिल डोले, एम.बी.ए. विभाग प्रमुख डॉ. विश्वजित कांबळे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. अभिषेक जवरे आणि प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. अमोल घुले यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

या अभियानामध्ये आडसूळ टेकनिकल कॅम्पस मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वच्छतेवर भर या विषयावर आपली मते व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विचारांना उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली, हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि या अभियानाचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सदरील प्रसंगी डीन-विद्यार्थी विभागाचे प्रमुख प्रा.स्नेहिल गायकवाड, प्रा. सचिन बोडंव्हे, डॉ. जी.आर भांड, प्रा. मंगेश पाटील, प्रा. ए.बी वाघमारे प्रा. एस.ए मानगुडे,प्रा. आर.व्ही दीक्षित, प्रा. जी.आर पवार, प्रा. शिवानी साळवे, प्रा. एस.एस झरेकर, प्रा. पी.एस वामन, प्रा. अश्विनी कुलकर्णी, प्रा. ए.बी वाघमारे, प्रा. आर.आर पुंड उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे