नगर तालुक्यात विकसित कृषि संकल्प अभियानास प्रतिसाद

नगर तालुक्यात विकसित कृषि संकल्प अभियानास प्रतिसाद
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती तसेच कृषि विभाग व आत्मा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यात राबविण्यात आलेल्या विकसित कृषि संकल्प अभियानास शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व विकसित कृषि संकल्प अभियान आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.
दिनांक ४ व ५ जून रोजी नगर तालुक्यातील निंबोडी, जांब, सोनेवाडी, निंबळक, इसळक, खारे-कर्जुने, बहिरवाडी, विळद, नांदगाव, सारोळा कासार, सोनवाडी आणि नेप्ती या निवडक १२ गावात अभियाना अंतर्गत कृषि विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून केव्हीके दहिगाव-ने व राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीने तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषि अधिकारी व आत्मा नगर च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बाबत माहिती दिली. या अभियानाच्या दरम्यान केंद्राच्या मार्फत कृषि रथ फिरवून कृषि योजना व कृषि तंत्रज्ञान विषयी जन-जागृती करण्यात आली. तसेच या कालावधीमध्ये विविध नवीन तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर देण्यात आली.
सदर अभियानामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि विस्तार शिक्षण संचालनयाचे संचालक डॉ. ससाणे, डॉ. अत्तार, श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे शास्त्रज्ञ माणिक लाखे, नारायण निबे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, इंजि. राहुल एस. पाटील, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट तसेच नियासम बारामती चे शास्त्रज्ञ डॉ. डी. डी. नांगरे व डॉ. सुशील चांगण, कृषि विभाग चे अधिकारी संदीप वराळे, माधवी घोरपडे, नारायण करंडे, अशोक वाळके, व आत्मा नगर अधिकारी चे उमेश डोईफोडे, प्रवीण गोरे यांनी सहभाग घेतला. तसेच या अभियानामधील १२ गावातील सरपंचश्री, शेतकरी उत्पादक कंपन्या, पुरुष व महिला शेतकरी गट, नैसर्गिक शेती गटाच्या प्रगतशील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.