Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र व तेलंगणा येथील आश्रमस्थ साधु व तपस्वीनी आणि उपदेशी पदयात्रेचे चिचोंडीत स्वागत

0 3 9 0 8 1

महाराष्ट्र व तेलंगणा येथील आश्रमस्थ साधु व तपस्वीनी आणि उपदेशी पदयात्रेचे चिचोंडीत स्वागत

एस डब्ल्यू न्यूज  /  नारायणडोह : रफिक शेख

परभणी येथील श्रीपंचकृष्ण तत्वप्रचारक मंडळ द्वारा आयोजित महाराष्ट्रातील परभणी , हिंगोली जिल्ह्यातील तसेच तेलंगणा राज्यातील आश्रमस्थ साधु , तपस्वीनी आणि उपदेशी भाविकांच्या पदयात्रेचे अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील मध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले .

यावेळी पदयात्रा पालखी व संचालक परभणी खानापूर चे परमपूज्य मंहत बाभुळगांवकर बाबा , परभणी जिल्यातील .बोरीचे परमपूज्य महत मालेराज बाबा मानेकर , पिंपळाभत्या चे परमपूज्य मंहत विश्वनाथ बाबा कोठी ,परभणी जिल्यातील बोरीचे परमपूज्य मंहत बिटरगांवकर बाबा , परमपुज्य मंहत गोमेराज जामेदेकर महानुभाव , खानापूर चे परमपुज्य मंहत केजकर बाबा , मंहत अर्जुनदादा नांदेडकर , मंहत शरददादा अंकुनळनेरकर , मंहत हंसराज दादा नांदेडकर ,शामदादा आकुळनेर कर , मोहनदादा शेवलीकर , तेलंगणा राज्यातील लिंगमपल्ली मोहनदादा मचाले , तेलंगणा राज्यातील गुरजालचे महत श्रीधर दादा मचाले , बोरीचे महत अक्षयदादा कपाटे यांचे सह सर्व साधु व तस्वीनीचे पूजन करून स्वागत करण्यात आले .

ही पायी पदयात्रा दि 21 जानेवारी रोजी पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथुन प्रारंभ झाली . पदयात्रेत चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करत जामगाव , नेप्ती , नागापूर , शेंडी, भिंगार ,अरणगाव , नारायणडोह मार्गे चिचोंडी पाटील येथे पोहचली . येथील स्थान वंदन करून दुपारी आरती करण्यात आली . पदयात्रेत 450 हुन अधिक भाविक सहभागी झाले आहेत . यात महिलांची संख्या लक्षणीय आहे .

यावेळी मंदीराचे पुजारी (चिचोंडीकर परिवार ) हरीभाऊ ठोंबरे , लक्ष्मीकांत ठोंबरे , रमेश ठोंबरे , संजय ठोंबरे , चक्रपाणि ठोंबरे , जामखेड तालुक्यातील पाटोदाचे चंद्रकांत बांदल ,राजेंद्र ठोंबरे , अतुल भोसले , सुनिल शिंदे ,ऋषिकेश ठोंबरे, शुभम ठोंबरे , सुदर्शन ठोंबरे , आनंद ठोंबरे ,सुयश ठोंबरे , निखिल ठोंबरे , तेजस ठोंबरे , आदित्य शिंदे, सार्थक ठोंबरे ,सुलोचना ठोंबरे , उषा ठोंबरे , अलका ठोंबरे ,जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील पुजारी आशा उदरभरे , स्मिता ठोंबरे , शैला ठोंबरे , भाग्यश्री ठोंबरे , मोहिनी ठोंबरे , रूपाली भोसले , प्रियंका शिंदे , सुप्रिया शिंदे , पियंका ठोंबरे ,चोरमारे , मनिषा वाघ , प्रतिभा ठोंबरे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे