Breaking
ब्रेकिंग

पोलीस हुतात्म्यांच्या शौर्याला डॉ. उद्धव शिंदे यांची आदरांजली

0 8 9 7 0 5

पोलीस हुतात्म्यांच्या शौर्याला डॉ. उद्धव शिंदे यांची आदरांजली

देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांचे बलिदान सदैव प्रेरणादायी – डॉ. शिंदे

अहिल्यानगर : देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन पाळण्यात येतो. या निमित्ताने अहिल्यानगर पोलीस मुख्यालय येथे स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी हुतात्मा पोलीस जवानांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांचे संरक्षण यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या पोलीस जवानांचा त्याग हा संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या शौर्याची आणि समर्पणाची आठवण प्रत्येक नागरिकाला देशसेवेची प्रेरणा देणारी आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाचा आदर राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दहा जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. देशभरात कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येते.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) शिरीष वमने, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे