Breaking
ब्रेकिंग

हिंद सेवा मंडळाच्या “स्टुडन्ट टॅलेंट सर्च” मध्ये जय बजरंग प्राथमिक विभागाचे ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

0 3 9 0 4 0

हिंद सेवा मंडळाच्या “स्टुडन्ट टॅलेंट सर्च” मध्ये जय बजरंग प्राथमिक विभागाचे ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

अहिल्यानगर : दि.२२फेब्रुवारी २०२५ शनिवार @. हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित, जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तर ४ विद्यार्थी शहर गुणवत्ता यादीत चमकले, त्यामध्ये इ.२ री चा चि. दर्शन गणेश घुले (१५० पैकी १२६ ) गुण मिळवून, जिल्हा गुणवत्ता यादीत ९ आला तर, कु. अंजली रवींद्र आव्हाड( १५० पैकी ११४ )गुण मिळवून जिल्ह्यात ११ वी आली. तसेच कु. आराध्या कैलास मेहेत्रे शहर गुणवत्ता यादीत( १५० पैकी ११६) गुण मिळवून शहर गुणवत्ता यादीत प्रथम आली . इयत्ता पहिलीचा चि. ईशान दीपक घुले (१५० पैकी १०२) गुण मिळवून शहर गुणवत्ता यादीत ३ रा आला.तर इ.. पाचवीचा चि. सिद्धेश अमोल क्षीरसागर( ३०० पैकी २३४ )गुण मिळवून प्रथम आला तर इ. पाचवीचा चि. आदेश अमोल क्षीरसागर ( ३०० पैकी २२८) गुण मिळवून शहर गुणवत्ता यादीत दुसरा आला! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

त्यांना श्रीम. सुरेखा दुधाडे मॅडम, श्रीम . छाया क्षीरसागर मॅडम, श्री. राहुल मोरे सर, श्री भागचंद पाखरे सर श्रीम. अश्विनी बेरड मॅडम, यांचे मार्गदर्शन लाभले! तसेच त्यांना आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. नरेंद्रजी फिरोदिया सर, सहसचिव श्री.उमेशची गांधी सर, व्यवस्थापक श्री.आशुतोष घाणेकर सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर सर यांच्यातर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या .

3/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे