मिळकतखार भरावामध्ये बोगस रॉयल्टी पावत्या दाखवून कोटयवधींचा खनिज घोटाळा..
दगड वाहतूक परवान्याच्या बोगस पावत्या वापरून केली माती/मुरूमाची वाहतुक . .
मिळकतखार भरावामध्ये बोगस रॉयल्टी पावत्या दाखवून कोटयवधींचा खनिज घोटाळा..
दगड वाहतूक परवान्याच्या बोगस पावत्या वापरून केली माती/मुरूमाची वाहतुक . .
ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
तालुक्यातील मिळकखार येथील वासवानी कंपनीच्या कांदळवन, सीआरझेड व ना विकास क्षेत्रामध्ये केलेला बेकायदेशीर भराव प्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत असून धनदांडग्यांनी आता चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाचीही फसूवणूक केल्याची तक्रार मिळकतखार ग्रामस्थ विनय विनायक कडवे व जगदीष नाना म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे.
गौणखनिजांवरील रॉयल्टी भरण्याचे बनावट पावती बुक छापून महसूल विभागाला करोडोंचा चुना लावण्याचे काम मिळकतखार येथील भराव करणाऱ्या कंपनीकडून सुरू आहे. भराव करणारे कंत्राटदार बनावट रॉयल्टी पावत्यांचा वापर करून भराव करत आहेत. हा प्रकार माहिती अधिकरामध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी उघडकीस आणला असून, आता प्रशासन फसवणूक करणाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या खनिज अधिकारी यांनी पेण तालुक्यात वैकुंठ पाटील यांना दिलेल्या दगड वाहतुकीच्या परवान्याचा वापर मिळकतखार येथे माती/मुरूम भरावासाठी केल्याची बाब महिती अधिकारामध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरून उघड झाली आहे.
वैकुंठ पाटील यांच्या नावाचा गैरवापर
पेण येथील वैकुंठ पाटील यांचा क्रशरचा व्यवसाय असून, त्यांनी नियमांत राहून शासनाची रॉयल्टी भरली आहे. सरकारने त्यांना केवळ दगड उत्खननासाठी परवानगी दिली आहे. मिळकतखार येथील ट्रक चालकाने मातीच्या भरावाबाबत दाखविलेल्या रॉयल्टीच्या पावत्या पूर्णपणे खोट्या असून, त्या पावत्यांवर ईटीपी नंबरदेखील नमूद नाही, मिळकतखार येथील भरवावावत वैकुंठ पाटील यांचा कोणताही संबंध नाही. याप्रकरणी पावत्यांचा गैरवापर करण्यात आला असून, प्रशासनाने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वैकुंठ पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
“रॉयल्टी भरुन दगड उत्खननाचे काम केले जाते. पावत्यांवर ईटीपी नंचर असणे अनिवार्य आहे. मिळकतखार प्रकरणातील पावत्या खोट्या आहेत. पावत्यांसोचत छेडछाड करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अर्ज देण्यात आला असून, खोट्या पावत्या चनविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.”
वैकुंठ पाटील, पेण
मंडळ अधिकारी सारळ यांनी तहसिलदार अलिबाग यांच्याकडे सादर केलल्या दि. 16/01/2025 च्या अहवाला मध्ये मौजे मिळकतखार येथील गट नं 47/2, 49,50,51 या मिळकती श्री. वरुण गोविंद वासवाणी व इतर यांच्या नावे दाखल आहे. सदर मिळकतीमध्ये ट्रक नं. एमएच-06-एक्यू-1519 च्या चालकाने सादर केलेल्या पावत्या या पावती पुस्तक क्र. 1605 अ.क्र. 89146, 89417, 89418 या अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील आदेष क.गौखशा.मु.सत्ख, परवाना/पाटील/2024-25, दिनांक :13/11/2024 अन्वये निर्गमीत करण्यांत आलेल्या असल्याचे माहिती अधिकारामध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पश्ट होत आहे. तसेच सदरच आदेष हे पेण येथील वैकुंठ रविंद्र पाटील यांना 5000 ब्रास दगड उत्खननासाठी देण्यात आलेले असल्याचेही स्पश्ट झाले आहे. याचाच अर्थ मिळकतखार येथे प्रत्यक्षात एकूण 154. 47 ब्रास भराव दगड वाहतुकीच्या पावत्या जोडून केलेला दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या मते हा भराव किमान एक हजार ब्रास करण्यांत आलेला आहे.
अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील आदेश दिनांक :13/11/2024 अन्वये ‘दगड’ वाहतुकीसाठी निर्गमीत करण्यांत आलेल्या आदेशाच्या बोगस पावत्या प्रत्यक्षात ‘माती/मुरूम’ भरावासाठी बेकायदा वापरल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी वासवानी कंपनीकडून महाराश्ट् गौण खनिज उत्खनन नियम 2013 व महाराश्ट् महसूल अधिनियम 1966 तरतुदीप्रमाणे दंडाची रक्कम वसूल करावी तसेच दोशी असणा-यांविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यांत आली आहे.