Breaking
ब्रेकिंग

अॅड. गौतम पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ;  जे.एस.एम. कॉलेज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

0 3 9 0 5 1

अॅड. गौतम पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ;  जे.एस.एम. कॉलेज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

अलिबाग / प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

जनता शिक्षण मंडळ, अलिबागचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील यांचा वाढदिवस शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जे.एस.एम. कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख मा. सौ. चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

त्यानंतर मा. अध्यक्ष अॅड.गौतम पाटील यांच्या शुभहस्ते आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारे आयोजित देश का प्रकृती परीक्षण अभियान, माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग तर्फे महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्यचिकित्सा शिबिर, एचडीएफसी बँक व सिव्हिल हाॅस्पिटल यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जे. एस. एम. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच अॅडव्हाओकेट दत्ता पाटील काॅलेज आॅफ लाॅ मधील विविध ज्ञानशाखा, वर्ग व विषयांमध्ये मार्च-एप्रिल २०२४ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महाविद्यालयातील कै. जयवंतराव केळुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र तसेच पदक देऊन गौरविण्यात आले. मा. अॅड. गौतम पाटील यांनी सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी परस्पर सहकार्यातून गुणवत्ता वाढ साधावी तसेच पुढील शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनावे” असे मत अॅड. मा. गौतम पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणारा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा महाविद्यालयातील कै.जयवंतराव केळुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी मा. अॅड. गौतम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कला, क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर व अलिबाग शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केक कापून मा. अध्यक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा मा. डॉ. साक्षी गौतम पाटील, सचिव मा. श्री. गौरव प्रमोद पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, संचालक मंडळाचे सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे