उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी जात असलेल्या जड वाहनामुळे व्यंकटेश नगर परिसरातील रस्ता खचला*
नागरीकांची नगर परिषदेला* *रस्ता दुरुस्तीची मागणी*
*उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी जात असलेल्या जड वाहनामुळे व्यंकटेश नगर परिसरातील रस्ता खचला*
*नागरीकांची नगर परिषदेला*
*रस्ता दुरुस्तीची मागणी*
राहुरी तालुका जावेद शेख
वरुड शहरातील व्यंकटेश नगर भागात नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे काम सध्या सुरू असून, त्या अनुषंगाने बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या वाहनांमुळे परिसरातील मुख्य रस्ता मोठया प्रमाणात खचला आहे , त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यंकटेश नगर ही एक शांत वसाहत असून, येथे दररोज शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य रहिवासी यांची सतत वर्दळ असते. अशा ठिकाणी बांधकामासाठी आलेल्या ट्रक व डंपर सारख्या जड वाहनांनी रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराने (कॉन्ट्रॅक्टर) यांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. “सरकारी कामासाठी रस्ता वापरणे समजण्यासारखे आहे, पण रत्यांच्या क्षमते पेक्षा जड वाहणा द्ववारे बिल्डींग मटेरियलची वाहतुक होत असल्या मुळे परिसराती रस्ता खराब झाला हा रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी घेणे हे संबंधित ठेकेदाराचे कर्तव्य आहे,” असे मत परिसरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
रस्त्याच्या खचण्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता असून, शाळकरी मुलांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. स्थानिक नगरपरिषद व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. – प्रा. सुरेंद्र सिनकर, व्यंकटेश नगर – वरुड*



