Breaking
ब्रेकिंग

शिंगणापूर देवस्थानचे सीईओ नितीन शेटे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0 8 6 5 2 2

शिंगणापूर देवस्थानचे सीईओ नितीन शेटे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

अहिल्यानगर प्रतिनिधी :- शिवाजी दवणे

(दि.२८/०७/२०२५) /  राज्यभर गाजले शनिशिंगणापूर मधून धक्कादायक बातमी समोर येत आहे सवीस्तर माहिती अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनिशिंगणापूरचे विश्वस्त नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळ जनक घटना समोर आली आहे. नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे शिंगणापूर मध्ये खळबळ उडाली आहे. नितीन शेटे माजी विश्वस्त आणि हे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्यानंतर शनिशिंगणापूर मध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्यांचा मृत्यदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेमुळे शनिशिंगणापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

नितीन शेटे हे आमदार शंकराव गडाख यांचे खंदे समर्थक होते. महिनाभरापूर्वी ११४ मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे शनिशिंगणापूर विश्वस्त कर्मचारी बाबत प्रश्न निर्माण केला गेला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते. तसेच देवस्थानची बनावट ॲप तयार करून अपरातफर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारकडून शिर्डी आणि पंढरपूर च्या धरतीवर शिंगणापूर मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पावसाळी अधिवेशन काळात ही माहिती सभागृहात दिली होती. आमदार विठ्ठलराव लंगे यांनी याविषयी सभागृहात लक्षवेधी काम केली होते.सध्या पोलिस, धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कडे चौकशी चालू आहे.

या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविलेला आहे, आता तपासात काय निष्पन्न होत आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा काही संबंध असेल का..? याविषयी सध्या तर्क वितर्क काढले जात आहे. पोलिसांनी अद्यापही अधिकृतपणे घटनेबाबत काही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पुढील चौकशीत काय समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे