Breaking
ब्रेकिंग

एफ आय आर दाखल करून 37 दिवस झाले तरीही आरोपीस अटक नाही, कारवाई न केल्यास आबासाहेब घनवट यांचा१५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

0 7 6 9 4 4

एफ आय आर दाखल करून 37 दिवस झाले तरीही आरोपीस अटक नाही, कारवाई न केल्यास आबासाहेब घनवट यांचा१५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १२/ बारामती सहकारी बँक शाखा करमाळा बाबत शेतकरी आबासाहेब लक्ष्मण घनवट यांचे फिर्यादी नुसार बँकेस तारण मालमत्ता सुमारे 2 ते 3 कोटी रुपयांची परस्पर संगनमताने विक्री केल्या प्रकरणी माजी नगरसेवक प्रविण जाधव, बँक शाखा अधिकारी काकासाहेब कोरडे व दिनेश घोलप यांचेवर मे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करमाळा पोलीस ठाण्यात 4 सप्टेंबर रोजी सुमारे 12 गुन्हा कलमे लावून F.I.R नोंदवला गेला आहे. गुन्हा दाखल होऊन सुमारे 37 दिवस झाले तरी देखिल आरोपी राजकीय पार्श्वभूमी मुळे शहरात मोकाट फिरत आहेत.

तरी आबासाहेब लक्ष्मण घनवट यांनी पोलिस प्रशासन यांना विनंती अर्ज करून देखिल कारवाई दखल होत नसल्याने, आरोपींना 14 ऑगस्ट पर्यंत अटक न केल्यास स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा आबासाहेब घनवट यांनी प्रशासनास दिला असून या बाबत मा. जिल्हाधिकारी सोलापूर, मा. पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, मा. पोलीस निरीक्षक करमाळा मा. तहसीलदार करमाळा यांना न्याय व कारवाई बाबत निवेदन दिलेले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे