Breaking
ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  त्रिशताब्दी निमित्त वॉकेथॉन स्पर्धेत वैशाली संदीप पाटील  यांनी  मारली बाजी

0 3 9 0 5 1

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  त्रिशताब्दी निमित्त वॉकेथॉन स्पर्धेत वैशाली संदीप पाटील  यांनी  मारली बाजी

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भाजप , स्मितोदय फाऊंडेशन ,मुंदडा बिल्डर्स च्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत ज्योती बापू महाजन तर वॉकेथॉन स्पर्धेत वैशाली संदीप पाटील  यांनी बाजी मारली आहे.
         छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून , भाजप चे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी ,जेष्ठ महिला रजनीताई केले , स्मितोदय फाऊंडेशन च्या अध्यक्षा भैरवी वाघ- पलांडे , अमेय मुंदडा यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय – ऋतुजा सुरेश पाटील , तृतीय – गीतांजली नितीन पाटील , उत्तेजनार्थ रितुजा गोपाल पाटील व ममता सुनील ठाकरे तर वॉकेथॉन स्पर्धेत द्वितीय- रोहिणी कृष्णकांत शिरसाठ ,तृतीय- गीतांजली विशाल खैरनार , उत्तेजनार्थ माधुरी प्रवीण पाटील व वैशाली यशवंत ठाकरे यांनी बक्षीस पटकावले. विजेत्यांना ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनिल शिंदे ,राष्ट्रवादी  तिलोत्तमा पाटील, खा शि संचालक निरज आग्रवाल,खा शि संचालक माधुरी पाटील, शिला पाटील,स्वप्ना पाटील , स्नेहा एकतारे , प्रदेश भाजप ओबीसी भारती  सोनवणे ,भाजप मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील ,राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन ,शीतल देशमुख,हरचंद लांडगे,माजी सभापती श्याम आहिरे,माजी जिप सदस्य संदीप पाटील, माजी जिल्हाउपाध्यक्ष महेश पाटील,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत उपस्थित होते.
       यावेळी प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत परिश्रम घेऊन विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंदूबाई पवार , खोकरपाट येथील शम्भू महिला शेतकरी गट , मुलींना मोफत शिकवणाऱ्या दिव्यांग  सलमाबी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. स्पर्धांचे पंच म्हणून तालुका क्रीडा समन्वयक  सुनील वाघ , महेश माळी ,संजय पाटील , प्रशांत वंजारी , जे व्ही  बाविस्कर , गोकुळ बोरसे ,सॅम शिंगाणे ,राहुल पाटील यांनी काम पाहिले.
       स्पर्धा यशस्वी करण्यासाठी , माजी नगरसेवक विक्रांत पाटील , श्याम पाटील,महेश पाटील, राकेश पाटील,राहुल पाटील, निवास मोरे,दिपक पवार,देवा लांडगे,राहुल चौधरी, समाधान पाटील,प्रवीण पाटील,कल्पेश पाटील, सागर शेटे, समाधान राजपूत,घनश्याम पाटील,राजेश खराडे,अमोल पाटील ,निखिल धनगर, निखिल पाटील यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे