Breaking
ब्रेकिंग

शिवसेना(शिंदे गट) पक्षाच्या तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील

0 3 9 0 6 1

*शिवसेना(शिंदे गट) पक्षाच्या तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : शिवसेना(शिंदे गट) पक्षाच्या अमळनेर तालुकाप्रमुख पदी सुरेश अर्जुन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून नियुक्तीपत्रावर शिवसेना सचिव संजय मोरे यांची सही आहे. यावेळी पारोळा आमदार अमोल पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सह सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, विष्णू भंगाळे, महिला जिल्हा प्रमुख सारिका माळी, अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. माजी आमदार चिमणराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी जि. प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, विक्रांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, अमित ललवाणी, रोहित कोकटा, संजय पाटील, प्रवीण पाटील, डॉ. विजय पाटील, रिटा बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे, ढेकू सिम सरपंच सुरेखा पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील, रितेश बोरसे, हेमंत भांडारकर आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे