अलिबागेत शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग चे आयोजन
अलिबागेत शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग चे आयोजन
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
अलिबाग:-रायगड जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने आणि सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग यांचे सहकार्याने दि.०१जानेवारी २०२५ ते दिनांक ३०जून २०२५ या कालावधीत ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वर्ग जे.एस.एम. काँलेज, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग सहा महिने चालविण्यात येणार असून दर शनिवार व रविवार हा वर्ग सुरू राहिल. त्या वर्गासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघातर्फे गेली ३५वर्षे हा ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग चालविण्यात येत असून या वर्गामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य बेरोजगार तरुणांना शाळा महाविद्यालये ,ग्रंथालये आणि शासकीय सेवेत नोकरी उपलब्ध झाली आहे.
तरी या वर्गासाठी प्रवेश घेणाऱ्यांनी सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग, डोंगरे हाँल येथे या वर्गाचे व्यवस्थापक व जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री भालचंद्र वर्तक(मोबाईल नंबर 9921551952)आणि सहाय्यक ग्रंथपाल सौ.रजिता माळवी (मोबाईल नंबर 8805716512) यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे व प्रमुख कार्यवाह तुकाराम पवार आणि जिल्हा ग्रंथालय अलिबागचे अध्यक्ष अँड.गौतम पाटील व कार्याध्यक्षा सौ.शैलाताई पाटील यांनी केले आहे.