Breaking
ब्रेकिंग

प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कमलाई अबॅकस क्लासेसच्या एकूण 47 विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ यशकल्याणी सेवाभावी संस्था येथे संपन्न

0 3 9 0 6 5

प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कमलाई अबॅकस क्लासेसच्या एकूण 47 विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ यशकल्याणी सेवाभावी संस्था येथे संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २५/ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दरवर्षी नॅशनल इंटरनॅशनल अशा परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये 2024- 25 या परीक्षेमध्ये भारतातून एकूण 12000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी कमलाई अबॅकस क्लासेसच्या एकूण 47 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षेचे टार्गेट होते 6 मिनिटात 100 गणिते सोडवणे. क्लासेसच्या अनेक विद्यार्थ्यांनी हे टार्गेट पूर्ण केले. तसेच कमलाई अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सिद्धी पृथ्वीराज देशमुख व दीक्षा दत्तात्रय दिवटे या दोन्ही विद्यार्थ्यांनी अबॅकस मध्ये मास्टरी मिळवली आहे. सिद्धी पृथ्वीराज देशमुख ही भारतातील सर्वात लहान (वय वर्ष 11) अबॅकस ग्रॅज्युएट ठरली आहे. यांचा बक्षीस वितरण समारंभ 20 एप्रिल रोजी यश कल्याणी सेवा भवन येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय. गिरिजा मस्के मॅडम (पोलीस स्टेशन करमाळा), पी.एस.आय. बनकर साहेब (पोलीस स्टेशन करमाळा), गणेश भाऊ करे पाटील (संस्थापक अध्यक्ष कल्याणी सेवाभावी संस्था म. राज्य), चंद्रशेखर शीलवंत सर (विश्वस्त विद्या विकास शिक्षण मंडळ करमाळा), थोरात गुरुजी (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा जातेगाव), सारिका विटूकडे मॅडम (प्रा. डॉ. संचालिका स्वयम संस्कार केंद्र करमाळा) इं. उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत अबॅकसमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयांमध्ये झालेली प्रगती याविषयीचे काही डेमो सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांनी मार्गदर्शकांबद्दल तसेच अबॅकस बद्दल आपली मते व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आदरणीय मस्के मॅडम यांनी अबॅकस काळाची गरज आहे. या शिक्षणाचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा असे मत त्यांनी मांडले.
शीलवंत सरांनी आजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि कमलाई क्लासेसच्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करत त्यांच्या गणितातील प्रगतीचे कौतुक केले. बनकर साहेबांनी विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षणाप्रती प्रोत्साहित केले. विटुकडे मॅडम यांनी विद्यार्थी हा पालकांची देखील जबाबदारी आहे पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल जागृत राहणे गरजेचे आहे याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले. थोरात गुरुजी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकास महत्त्वाचा आहे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासामध्ये अबॅकस सारख्या बौद्धिक खेळात्मक शिक्षणाची आवश्यकता आहे, तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये विविध स्किल महत्त्वाची आहे यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. गणेश भाऊ करे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच अबॅकस मध्ये यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि भविष्यामध्ये असेच विद्यार्थी करमाळ्याचे भविष्य ठरणार आहेत, त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अशा अबॅकस सारख्या विविध शिक्षण पद्धतीची गरज आहे असे मत व्यक्त केले. अबॅकस मध्ये मास्टरी मिळवलेल्या विद्यार्थिनींचे देखील खूप खूप कौतुक केले. यानंतर विद्यार्थिनींना यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून स्कॉलरशिप जाहीर केली. विद्यार्थ्यांना तसेच क्लासेसच्या संचालिकां मंजुश्री मुसळे मॅडम यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी अबॅकस मध्ये मास्टरी मिळवलेले विद्यार्थी यांना सन्मानपत्र व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

अबॅकस मास्टरी मिळवलेल्या विद्यार्थिनी दीक्षा दत्तात्रय दिवटे, सिद्धी पृथ्वीराज देशमुख.

*प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी*
तेजस्विनी सुनील शिंदे
श्रेयस श्रीकांत चव्हाण
वरून राम शेंडगे
राघव गजराज चिवटे
अर्पिता अमित परदेशी
*द्वितीय क्रमांक*
दिया अच्युतराव कामठे
आरुष अमोल नलवडे
सानवी महेश क्षीरसागर
वेदिका सारंग पुराणिक
निरंजन अमोल शहा
*तृतीय क्रमांक*
रणवीर कमलाकर सपते
ओम अमोल सरडे
अर्पित यशराज दोशी
राजवीर श्रीमंत हांगे
सुयश संदीप बोकन
श्रावणी गणेश शिरसागर
मधुरा मयूर मुसळे
ईश्वरी औदुंबर माकुडे
*फायनलीस्ट आलेले विद्यार्थी*
प्रथमेश करचे, श्रेया बोकन, श्रेया दाभाडे, ध्रुव जाधव, सर्वेश नेटके, सृष्टी निर्गुणकर, स्वरा क्षीरसागर, वैष्णवी क्षीरसागर, राज बदे, अक्षित क्षीरसागर, रीचल दोशी, सई गिरी, आरुष नलवडे, अवधूत बुधवंत, श्री तेज घनवट, आर्षद मुलानी, ईश्वरी परदेशी, ईश्वरी पुराणिक, अलिशा मुलानी, प्रणिती माकुडे, श्रेया चव्हाण, युवराज सापते, पृथ्वीराज सापते, आदित्य त्र्यंबके, आविराज राठोड.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ मंजुश्री मयूर मुसळे (संचालिका कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस करमाळा) यांनी केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे