Breaking
ब्रेकिंग

टिव्ही.सेंटरच्या दत्त मंदिरात जयंती उत्साहात संपन्न

0 3 9 0 6 1

टिव्ही.सेंटरच्या दत्त मंदिरात जयंती उत्साहात संपन्न

एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी

नगर-सावेडीतील टिव्ही सेंटर,येथील मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी गुरुचरित्र पारायण होऊन दत्तगुरूंच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.संध्याकाळी ओम संगीत विद्यालयच्या राजेंद्र उल्हारे,ओम उल्हारे,बलराम खडामकर,अंकुश रोकडे,यश रोकडे विशाल अडागळे,अनंत द्रविड यांनी दत्तगुरूंची भजने व गाणी सादर केली .
सायं ६.वा.विघ्णहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक योगेशभाऊ सोनवणे पाटील व रुपाली सोनवणे या दांपत्याच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली व श्री दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नंतर सर्वाना प्रसाद वाटण्यात आला. यावेळी भाऊ कांडेकर,महेंद्र कंदलकर , सुनील डहाळे,सचिन तनपुरे,सौ महाजन,सौ आकूबत्तीनं,सौ तनपुरे,सौ घावटे आदिसह मोठ्या संख्नेने भाविक उपस्थित होते .
तसेच सोमवार, दि.१६रोजी दुपारी १२ ते ३ वा.मंदिर प्रांगणात महाप्रसाद भंडारा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन विघ्नहर्ता प्रतिष्टान,सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, मनपा अग्निशामक दल,सावेडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे