Breaking
ब्रेकिंग

राहुरी कृषी विद्यापीठामार्फत निंबवडे येथे हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंबावरील तेल्या रोगाबाबत मार्गदर्शन

0 8 9 6 9 5

राहुरी कृषी विद्यापीठामार्फत निंबवडे येथे हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंबावरील तेल्या रोगाबाबत मार्गदर्शन

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे समन्वित हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी निंबवडे (ता. आटपाडी, जि. सांगली) गावात डाळिंब पिकावरील तेल्या रोगासाठी आर्थिक नुकसान पातळी आढळून आलेल्या क्षेत्रांसाठी विशेष सल्ला देण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाने तयार केलेली डाळिंब तेल्या रोगावरील सविस्तर मार्गदर्शन पुस्तिका ऑनलाईन ई-मेल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संबंधित तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रविंद्र गुटकुडे यांना पाठविण्यात आली होती. सदर मार्गदर्शक पुस्तिकांचे निंबवडे ग्रामपंचायत कार्यालयात तसेच तेल्या रोगाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन वाटप करण्यात आले.
या दरम्यान शेतकऱ्यांना डाळिंब तेल्या रोगाचे लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, योग्य कीड-रोग नियंत्रण पद्धती व शाश्वत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठामार्फत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर व अचूक नियंत्रण करण्यास मदत होणार आहे. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी प्रकल्प प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे व संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे, हॉर्टसॅप प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे