Breaking
ब्रेकिंग

विविधतेतील एकतेचे दर्शन घडवत हार्मोनी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

0 8 6 5 2 2

विविधतेतील एकतेचे दर्शन घडवत हार्मोनी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी : आसावरी वायकर

हार्मोनी इंटरनॅशनल स्कूल वडगाव गुप्ता चे स्नेहसंमेलन माऊली संकुल येथे उत्साहात पार पडले .यावेळी भारतीय सण उत्सव यांचे सादरीकरण दाखवत भारतात विविधतेतील एकतेचे दर्शन घडविले. याला अनुसरूनच विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याचे सादरीकरण केले .
ज्यामध्ये दुर्गा पूजन गणपती उत्सव,श्रीकृष्ण जन्माष्टमी भारताचे राष्ट्रीय सणाचे महत्त्व दिवाळी उत्सव, सैनिकाचे धैर्य याविषयी विविध नृत्य आणि नाटकांची सादरीकरण करण्यात आले यावेळी शाळेत खेळत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच शाळेतील आदर्श शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे दोन सत्रात विभाजन करण्यात आले होते प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मकरंद धर्मा (बालरोग तज्ञ) आणि डॉ. धनश्री धर्म उपस्थित होते.
द्वितीय सत्रात बार असोसिएशनचे एडवोकेट कृष्णा झावरे, टी एम व्ही लॉ कॉलेज (खारघर )च्या प्राध्यापिका वर्षा बडवे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .


यावेळी हार्मोनियम इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका बिना थम्पी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक अशोक बेरड यांनी शाळेचा यशस्वी यशोदायी अहवाल सादर करत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणाबद्दल कौतुक करण्यात आले.
यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

3.7/5 - (4 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे