सडे येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी केले दोन तासात अटक
सडे येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी केले दोन तासात अटक
राहुरी तालुका जावेद शेख
फिर्यादी नामे , सुनील साईनाथ बर्डे राहणार सडे ता. राहुरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 664/ 2026 बी एन एस कलम 103(1) वगैरे प्रमाणे दिनांक 08/06/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी 1) सुनील गंगाधर पवार २) लक्ष्मण भाऊसाहेब माळी ३) सागर सुभाष बरडे सर्व राहणार सडे ता. राहुरी याला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले असून त्याला दि. 08/06/2026 रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीस दि. 15/06/2026 पावेतो पोलीस कोठडी दिलेली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सो मुम्मका सुदर्शन सो, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर सो तसेच माननीय पोलीस निरीक्षक विजय देशमुख सो व ठेंगे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सय्यद पोलीस हवालदार/ दारकुंडे , पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, कुऱ्हाडे ,भाऊसाहेब शिरसाठ, यांनी केली आहे



