Breaking
ब्रेकिंग

भरधाव जाणाऱ्या नवीन बसने डंपरला मागुन धड़क दिल्याने बसचालक व एक प्रवासी जखमी*

नवीन बस अद्यावत असून, याबाबत चालकांना प्रशिक्षण देण्याची गरज ?*

0 8 6 7 0 2

*भरधाव जाणाऱ्या नवीन बसने डंपरला मागुन धड़क दिल्याने बसचालक व एक प्रवासी जखमी*

*नवीन बस अद्यावत असून, याबाबत चालकांना प्रशिक्षण देण्याची गरज ?

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : भरधाव जाणान्या बसने डंपरला मागुन धडक दिल्याने बसचालक व एक प्रवासी जखमी झाल्याची घटना सकाळी साडेसातच्या सुमारास
अमळनेर धुळे रस्त्यावर झाली. गोरख भगवान पाटील डपर (एमएच५४,३५९) डिझेल भरण्यासाठी धुळे रोडला जात असताना त्याने आर. के, नगरजवळ गतिरोधक आल्याने वाहन हळू केले. त्याचवेळी अमळनेर पुणे बस (एमएच १४एमएच२६८७) डंपरला मागून धडकली.धडक जोरात बसल्याने एसटी चालकाचे पाय केबिन मध्ये अडकले.
तर एका प्रवाश्याच्या डोक्याला मार लागला, आजूबाजूला नागरिकांची गर्दी होती. सुमारे पाऊण तासानंतर चालकाचे पाय बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान ही बस नवी असून याची मला चालवण्याची सवय नसल्याने मला नवी बस देऊ नका असे चालक मनोहर पाटील यांनी सांगितले होते. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
चालक उशिरा आगारात आले त्यामुळे बसला देखील उशिर झाला. दरम्यान अमळनेर आगाराला नुकत्याच पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या असून त्यातील दोन बसेसचा अपघात झाला आहे.
चालकांना नवीन बसची सवय नसल्याने त्यांनी नवीन बस चालवण्यासाठी नकार दिला होता. दरम्यान, या नवीन बस अद्यावत असून, याबाबत चालकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
आपल्याकडील चालकांना जुन्या बस चालविण्याची सवय असल्याने त्यांना नव्या बस चालवताना अडचणी येत आहेत, याबाबत आगारप्रमुखांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
जे चालक प्रशिक्षित आहेत त्यांनाच या बस चालवण्यासाठी देणे हि मागणी प्रवाशांनी केली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे