सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली टाकळी काझी येथे रस्ता रोको आंदोलन
सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली टाकळी काझी येथे रस्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी : बाबु तिपुळे
अहिल्यानगर तालुक्यांतील नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथे आज सकाळी सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . गेले चार वर्षे पूर्वे सोलापुर हायवे ते शिराढोण उक्कडगांव टाकळी काझी नगर जामखेड हावेय हा रोड हा सार्वजानिक बांधकाम विभागाकडे मंजुर करण्यात आला होता पण संबंधीत ठेकेदाकडुन व संबंधीत अधिकारी यांच्याकडुन या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे संतप्त नागरिकांना खुप मोठा त्रास सहन करावा लागतो टाकळी काझी येथे मोठी बाजार पेठ असल्यामुळे शेतकरी कामगार नोकरदार वर्ग यांना सातत्याने टाकळी काझी येथे दवाखाना बँक आठवडा बाजार शेतीसाठी औजारे पेट्रोल डिझेल असे अनेक जिवनआवश्यक मिळणाऱ्या सोई सुविधा साठी सातत्याने दळणवळण करावी लागते
पण जाण्यासाठी रस्ता मृत्युचा सापळा बनला असून सातत्याने या रोडवर छोटे मोठे अपघात झाले असून नागरिकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधीत अधिकारी यांनी सरपंच नवनाथ म्हस्के यांच्या सर्व अटी मान्य करून तत्काळ लेखी स्वरूपात तातडीने रस्याचे काम सुरू करण्यासाठी आशवासन देत उपोषण सोडले .
यावेळी पोलिस बांधवांनी मोठे योगदान दिले व सर्व वाहतुक व्यवस्थित केली . उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के मांडवे गावचे सरपंच सुभाष निमसे शिराढोण गावचे सरपंच दादासाहेब दरेकर टाकळी गावचे उपसरपंच हर्षद कांबळे अविनाश पवार मा. सरपंच बाळासाहे म्हस्के सागर शिंदे इंज़ि .आप्पासाहेब म्हस्के व उक्कडगाव टाकळी काझी शिराढोण चे सर्व आजी माजी सरपंच तसेच युवा नेतृव व सर्व गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सावंत गुरुजी यांनी आलेल्या सर्व ग्रामस्तांचे आभार मानले



