Breaking
ब्रेकिंग

सत्तेच्या खेळात हरवलेला कार्यकर्ता : निष्ठेची किंमत कोण देणार?

0 8 6 7 0 2

सत्तेच्या खेळात हरवलेला कार्यकर्ता : निष्ठेची किंमत कोण देणार  ?

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

आजचे राजकारण केवळ सत्ता मिळवण्याचा खेळ राहिला आहे. युती, आघाड्या, फोडाफोडी, सोयीस्कर समझोते — या सगळ्या गणितात एक घटक मात्र कायम दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे सामान्य, निष्ठावान कार्यकर्ता.
ज्या विचारधारेसाठी कार्यकर्त्याने आयुष्य वेचले, ज्या विरोधकांविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष केला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, नाती तोडली — त्याच विरोधकांशी जेव्हा “राजकीय गरज” म्हणून हातमिळवणी होते, तेव्हा कार्यकर्त्याच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार?
निष्ठा गुन्हा ठरतोय का?
आज अशी वेळ आली आहे की कार्यकर्त्याची निष्ठाच त्याच्यासाठी शिक्षा ठरते आहे.
नेते मंचावर मिठी मारतात, फोटो काढतात, हसत-खेळत एकत्र येतात. पण खालच्या स्तरावरचा कार्यकर्ता मात्र अजूनही जुन्या संघर्षाच्या जखमा घेऊन फिरतो.
त्याच्या नजरेत तो “कट्टर”, “अडेलतट्टू” ठरतो — कारण त्याने विचार बदलले नाहीत.
मैत्री, नाती आणि समाज यांची होळी
चार दिवसांच्या निवडणुकीसाठी वर्षानुवर्षांची मैत्री संपते.
एकाच गल्लीतील लोक एकमेकांशी बोलत नाहीत.
नातेवाईकांत कटुता निर्माण होते.
आणि हे सगळं कोणासाठी?
— त्या नेत्यांसाठी, जे उद्या सत्तेसाठी पुन्हा एकत्र येणार असतात.
कार्यकर्त्याची व्यथा कुणी ऐकणार आहे का?
नेते बदलतात, झेंडे बदलतात, घोषणा बदलतात.
पण कार्यकर्त्याची ओळख मात्र कायमची “वादग्रस्त” ठरवली जाते.
तो ना सत्तेत असतो, ना निर्णयात.
फक्त आदेश पाळण्यासाठी आणि झेंडा खांद्यावर घेण्यासाठी तो उपयोगात असतो.
राजकारण समाजासाठी की समाज राजकारणासाठी?
राजकारण हे समाज बदलण्यासाठी असते, समाज फोडण्यासाठी नाही.
सत्ता हे साधन असायला हवे, अंतिम ध्येय नव्हे.
जर राजकारणामुळे माणसं तुटत असतील, मैत्री संपत असेल, समाजात दुरावा वाढत असेल — तर त्या राजकारणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
जनतेला आणि कार्यकर्त्यांना आवाहन
आपण ज्या नेत्यांसाठी आपली माणसं गमावतो, ते नेते उद्या पुन्हा एकत्र येऊ शकतात.
मग आपण कायमचे का तोडायचे?
चला,
राजकारण राजकारणाच्या जागी ठेवूया.
विचारांशी निष्ठावान राहूया, पण माणसांशी वैर नको.
सत्तेपेक्षा समाज,
आणि राजकारणापेक्षा माणुसकी मोठी आहे — हे पुन्हा एकदा ठामपणे सांगूया.

– – – संजय देवराम सांगळे
( जळगांव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महानगर कार्यालय प्रमुख )

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे