Breaking
ब्रेकिंग

पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0 8 9 7 0 5

पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल येथे शहरातील विविध शाळांतील १५० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष असून गेल्या दशकभरात सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून फाउंडेशनने शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गणेश अवधूत, इंजि.प्रशांत कोक्कुल, इंजि. अक्षय बल्लाळ, अमित सुंकी, बाबासाहेब तिपुले, राजू कोडम उपस्थित होते. यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी, सचिव अजयकुमार लयचेट्टी, उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल, राजेंद्र बुलबुले, वरद लकशेट्टी, ओंकार आडेप, ओंकार जेटला यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावर्षी श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक विद्यालय, दादा चौधरी मराठी शाळा, महात्मा फुले विद्यामंदिर, दादा चौधरी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उक्कडगाव), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, बालक मंदिर महिला मंडळ, सिताराम सारडा माध्यमिक विद्यालय, मनोहरलाल रामचंद्र सबलोक प्राथमिक विद्यालय, शारदा विद्यामंदिर, १०८ श्री महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालय, श्रीमती पार्वतीबाई डहाणूरकर कन्या विद्यालय आणि महर्षी ग. ज. चितांबर विद्यामंदिर या शाळांमधील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे