Breaking
ब्रेकिंग

पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल ; पिकांचे मोठे नुकसान*

0 8 6 5 2 1

*पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस*

*हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल ; पिकांचे मोठे नुकसान*

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- पारोळा तालुक्यात गुरुवारी (दि. २) सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि काही क्षणातच जोरदार पावसाला सुरुवात झाली, या अनपेक्षित बदलामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.
तालुक्यातील बहादरपुर मंडळातील वसंतनगर, पिंपळकोठा, भोलाणे, जिराळी, इंधवे, महाळपूर, शिरसोदे, बहादरपुर, सह आदी भागात जोरदार वादळासह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचा काढणीला आलेले मका, बाजरी, ज्वारी, गहू यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर आडवी पडली. काही ठिकाणी काढून ठेवलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने नुकसान अधिकच वाढले. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांवर दुहेरी संकट गेल्या चार महिन्यांपासून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने मका, गहू, बाजरी, ज्वारी आदी पिकांची लागवड केली होती. खत, बियाणे, मजुरी यावर हजारी रूपये खर्च करून उभे केलेले पीक हाती येण्याच्या टप्प्यावर असताना अवकाळी पावसाने घात केला. परिणामी, शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नावर पाणी फिरले असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
या झालेल्या नुकसानीचा सरसकट पंचनामा करून शासनाकडून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांकडून होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे