Breaking
ब्रेकिंग

आशिष नारखेडे याने MTS स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून दिमाखदार यश संपादन

धरणगाव केंद्रात साळव्याचा झेंडा ; जिद्द, मेहनत आणि यशाची कमाई सार्थक नारखेडे प्रथम क्रमांकावर*

0 8 6 5 3 0

*आशिष नारखेडे याने MTS स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून दिमाखदार यश संपादन*

*धरणगाव केंद्रात साळव्याचा झेंडा ; जिद्द, मेहनत आणि यशाची कमाई सार्थक नारखेडे प्रथम क्रमांकावर*

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

साळवे :- बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आपल्या सर्वांना परिचित आहे त्याचा प्रत्यय येथील साने गुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालयाचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सार्थक आशिष नारखेडे याने महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) स्पर्धा परीक्षेत धरणगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून आशिष नारखेडे याने महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) स्पर्धा परीक्षेत धरणगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून दिमाखदार यश संपादन यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे साळवे गावासह परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिशय लहान वयातच सार्थकने मिळवलेले हे यश त्याच्या जिद्दीचे, परिश्रमाचे ,आणि शिक्षकांच्या व आई-वडिलांच्या सक्षम मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जात आहे. वस्ताद जाकीर हुसेन वयाच्या १२ वर्षी तबला वाजवायला लागला तरी तो तबलावादक मध्ये जगविख्यात झाला, सार्थक तर फक्त ७/८वर्षाच्या आहे तो जर एवढे यश MTS परिक्षेत मिळवतो तर तो निश्चित UPSC सारख्या परीक्षा सुद्धा सहज शक्य करू शकतो. व अजून उतुंग यश मिळवू शकतो..सलाम त्याच्या यशा स,मेहनतीस.त्याच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक उंचावला असून इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.
या यशाबद्दल ग्राम सुधारणा मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे तसेच साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांच्या हस्ते सार्थकचा सत्कार करण्यात आला. यावेळी साने गुरुजी सेमी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री कोल्हे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी सार्थकचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सार्थकच्या या यशामुळे शाळा व गावाचा लौकिक वाढला असून भविष्यातही तो अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे