Breaking
ब्रेकिंग

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये विविध समित्यांची बैठक रात्रशाळेतून उजळणार विद्यार्थ्यांचे भवितव्य

0 7 6 9 4 3

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये विविध समित्यांची बैठक
रात्रशाळेतून उजळणार विद्यार्थ्यांचे भवितव्य

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : आसावरी वायकर

हिंद सेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज तसेच भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अध्यक्ष प्रा. ज्योतीताई कुलकर्णी व महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष सौ उज्वला साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत शाळेच्या विविध कार्यांचा आढावा घेण्यात आला. प्राचार्य सुनील सुसरे यांनी रात्रशाळेस इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व कौशल्य विकास, स्वयंरोजगारासाठी सहकार्य करणारी मासूम संस्था (मुंबई) व कौशल्य विकासासाठी मदत करणाऱ्या जनशिक्षण संस्था, मिटकॉन, अरेना फाउंडेशन (मुंबई), रोटरी क्लब या संस्थाबद्दल उपस्थित सदस्यांना माहिती माहिती देऊ रात्रशाळेस सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानण्यात आले.तसेच घरच्या परिस्थितीमुळे तसेच विवाह लवकर झाल्यामुळे शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणून रात्रशाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न, शैक्षणिक सुविधा, भौतिक सोयी आणि शाळेच्या प्रगतीसाठी आवश्‍यक उपाययोजना यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस समितीच्या अध्यक्षा तथा नाईट हायस्कूलच्या चेअरमन ज्योतीताई कुलकर्णी, माजी चेअरमन डॉ. पारस कोठारी, सचिव तथा मुख्याध्यापक सुनील सूसरे, शिक्षक प्रतिनिधी गजेंद्र गाडगीळ, विधीतज्ञ ॲड. आशिष सुसरे, सुनिता गोरे, अशोक खरे, वृत्त छायाचित्रकार वाजिद शेख, डॉ.नम्रता मराठे, डॉ. बिंदूताई शिरसाट समुपदेशक उषा खोलम, वैशाली धनवडे, माजी विद्यार्थीनी मनीषा आडेप, अर्चना नाढे, समिती समन्वयक वृषाली साताळकर, बाळू गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, संपूर्ण राज्यातील रात्रशाळांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूल आघाडीवर आहे. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षण हे केवळ ज्ञानार्जन नसून व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम आहे. रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी मेहनती, जिद्दी व जबाबदार असून, त्यांच्या प्रगतीसाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, प्रपंच सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी आपले भवितव्य घडवत आहेत. त्यांच्या सोयीसाठी शाळेत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजच्या काळात शिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आवश्‍यक आहे. भाई सथ्था नाईट हायस्कूलने अनेक वर्षांपासून कामगार, गृहिणी, कामगार वर्गातील युवकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. रात्रशाळेच्या माध्यमातून अनेकांनी नवी दिशा मिळून त्यांचे भवितव्य घडले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील शिक्षक दैनंदिन ज्यादा वेळ देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून आपले स्थान समाजात निर्माण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व सर्व समितीच्या कामकाजासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी माझी कार्याध्यक्ष अनंत फडणीस ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, ब्रिजलालजी सारडा सर्व समितीचे पदाधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे