Breaking
ब्रेकिंग

ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

0 8 6 7 0 3

ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : संवेद वायकर

दि. १ मे रोजी ज्ञानसंपदा शाळेत महाराष्ट्र दिन जागतिक कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व देशभक्ती पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्र गीत शाळेच्या गायक वृंदानी सादर करून वातावरण भारावून टाकले. तसेच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत ‘माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटास टिळा’ या गीताचे गायन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ. सतीश मोरे उपस्थित होते. तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक बालरोग तज्ञ डॉ. रवींद्र वाकडे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय मा. मुख्याध्यापिका श्रीमती शिवांजली अकोलकर यांनी करून दिला. डॉक्टर सतीश मोरे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण जी बजाज व डॉक्टर रवींद्र वाकडे यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष श्री मिलिंदजी गंधे सर यांनी केला. कामगार दिनाविषयी कु. श्रेया करवंदे, महाराष्ट्र दिनाविषयी कु. श्रुती गहिरे, बुद्ध पौर्णिमा विषयी कु. खुशी काळे या विद्यार्थिनींनी आपापली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंदजी गंधे सरांनी शाळेतील सर्व शिक्षक व मुलांचे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विमा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच कोणतेही काम कमी दर्जाचे नसते असेही सांगितले. डॉ. सतीश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजारी पडल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आरोग्य चांगले राहावे म्हणून काळजी घेण्याचे आवाहन केले. मुलांचे मानसिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक आरोग्य याविषयी जागृत राहण्याचा सल्ला दिला. सामाजिक मूल्यांची रुजवणूक व कृतज्ञता भाव असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. १०वीचे विद्यार्थी ओम पेठे व अक्षरा राठोड यांनी केले. तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवांजली अकोलकर यांनी मानले. शाळेसाठी आवश्यक ती मदत, सहकार्य करणाऱ्या पालकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जी बजाज, उपाध्यक्ष मिलिंदजी गंधे, मुख्याध्यापिका श्रीमती शिवांजली अकोलकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे