शिळफाटा येथील रस्ता रुंदीकरणासाठी “आप”ने पुकारले उपोषणाचे हत्यार
15 मे रोजी बसणार उपोषणाला : डॉ पठाण

शिळफाटा येथील रस्ता रुंदीकरणासाठी “आप”ने पुकारले उपोषणाचे हत्यार
15 मे रोजी बसणार उपोषणाला : डॉ पठाण
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
खोपोली शिळफाटा येथील आरे डेरी ते गाझी बाबा दर्गा पर्यंत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 अतिशय अरुंद असल्याकारणाने खूप जास्त प्रमाणात अपघात होत असतात व दररोज वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे तेथील रहिवाशांना व दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
आम आदमी पार्टी तर्फे सदर रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याबरोबर वारंवार बैठका व पत्र व्यवहार करून सुद्धा सदर रस्ता रुंदीकरणाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.
सदर रस्ता लवकरात लवकर रुंदीकरण व्हावा व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान, खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, खोपोली शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय व इतर पदाधिकारी गुरुवार दिनांक 15 मे 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत व सदर रस्ता लवकरात लवकर रुंदीकरण सुरू न झाल्यास आमरण उपोषण करू असे डॉ. पठाण यांनी सांगितले.



