Breaking
ब्रेकिंग

माळीवाडा येथे काळ भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

0 8 6 5 1 4

माळीवाडा येथे काळ भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

अहिल्यानगर : माळीवाडा ब्राह्मण गल्ली येथील श्री काळ भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती स्थापनेचा सोहळा दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मंदिरास स्टीलचा दरवाजा अर्पण करण्याचा उपक्रमही पार पडला.
कै. भागीरथाबाई बाबुराव लकशेट्टी यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू वरद गणेश लकशेट्टी यांनी मंदिरासाठी स्टीलचा दरवाजा अर्पण करून आदर्श उपक्रम राबविला. त्यांच्या या योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

यावेळी मंदिराचे अध्यक्ष चरण भाऊ परदेशी, उपाध्यक्ष मिलिंद काका लकशेट्टी यांच्यासह सुनील जैन, रोहित कावळे, भाऊ उरणे, अमोल लकशेट्टी, सतीश तांबोळी, तुषार वाघ, विशाल जाधव, संतोष नन्नवरे, अमोल शेठ ठाकूर, महेश भाऊ चिंतामणी, कचरू परदेशी, महेंद्र लकशेट्टी, सागर कापसे, गणेश शेठ चिंतामणी, विनीत कावळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष चरण भाऊ परदेशी व उपाध्यक्ष मिलिंद काका लकशेट्टी यांनी वरद लकशेट्टी यांचे मंदिरास दरवाजा अर्पण केल्याबद्दल आभार मानले. या उपक्रमामुळे परिसरात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले असून, मंदिराच्या सुशोभीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे