गावांची साधनं संपत्ती परस्पर विकली सरपंचाने… वनविभाग दखल घेऊन कारवाई करणार का?
या अपहार प्रकरणी काय कारवाई होणार ? या विषयी गावकर्यांची उत्सुकता शिगेला

गावांची साधनं संपत्ती परस्पर विकली सरपंचाने… वनविभाग दखल घेऊन कारवाई करणार का ?
या अपहार प्रकरणी काय कारवाई होणार ? या विषयी गावकर्यांची उत्सुकता शिगेला
एस डब्ल्यू न्यूज / प्रतिनिधी
अहिल्या नगर:- प्रतिनिधी नगर तालुक्यातील आठवड या ठिकाणी नुकतीच उघडकीस आलेली घटना आठवड ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर भाग एक मधील पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचे चिंचेचं झाड सदर झाडा पासून दरवर्षी पाच ते दहा हजार रुपये ग्रामपंचायत उत्पन्न मिळत होते.सदर झाडाचा कुठं लिलाव ग्रामसभेत विषय,सदर वन विभाग नगर झाड तोडण्यासाठी परवानगी न घेताच सदर झाड हे तोडण्यात आले आहे.सदर रक्कम सरपंच सविता सुनिल लगड व पती सुनिल जबाजी लगड यांनी चिंचेचं झाड तोडल्यानंतर आलेल्या पैसा ग्रामपंचायत खात्यात भरणा करण्यात आला नाही.सदर रक्कम सरपंच यांनी स्वतः फायद्यासाठी रक्कम वापरली आहे.तसेच गट क्रमांक २७३ मधील बांबूच्या झाडाचा ग्रामसभेत विषय ठराव न घेताच परस्पर विक्री केली त्यांचे पैसे ग्रामपंचायत कार्यालयात अथाव ग्रामपंचायत खात्यात भरणा करण्यात आलेला नाही.अशी माहिती व तक्रार माजी सरपंच राजेंद्र मोरे यांनी पंचायत समिती अहिल्यानगर कार्यालयात लेखी तक्रार दाखल केल्यानंतर प़ंचायत समिती नगर कार्यालयाच्या माध्यमातून गट विस्तार अधिकारी खाडे साहेब यांनी सदर तक्रारीवरून प्रत्यक्ष जागेवर जाऊन वृक्षतोडीचा पंचनामा केला त्या मध्ये चिंचेचं झाड,व शासकीय जमिनीवरील बांबूचे झाड तोडली गेले आहे.स़रपंच यांनी झाडांचा अपहार केला आहे असे निवेद्वारे तक्रार आठवड माजी सरपंच राजेंद्र मोरे यांनी देलेले आहे. सदर तक्रार अर्जावरून सदर सरपंच वर पंचायत समिती कार्यालय काय कारवाई करणार या कडे आठवड ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरीक या कारवाई कडे लक्ष ठेवून आहे.



