Breaking
ब्रेकिंग

डॉ. काकडे कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

डॉ. सुभाष बन्सी काकडे यांचे शैक्षणिक कार्य अभिमानास्पद

0 8 6 5 1 0

डॉ. काकडे कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

डॉ. सुभाष बन्सी काकडे यांचे शैक्षणिक कार्य अभिमानास्पद

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील प्रसाद फौडेंशन संचलित डॉ. सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. तर सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात बोर्ड परीक्षा, सीईटी, सेट, नीट या परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

यावेळी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये रोकडे आरती विलास ७७.१७ टक्के, गागरे ज्ञानेश्वरी रावसाहेब ७२.५० टक्के, हारदे कुणाल दत्तात्रय ६६.८३ टक्के तर वाणिज्य शाखेतील ढवळे माधुरी उत्तम ८६.३३ टक्के, जगदाळे भाग्यश्री तुकाराम ८५.५० टक्के, झावरे तनुजा विजय ८५ टक्के गुण मिळवून यश संपादित केले आहे.

 

तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये शेख शबनम युनुस ८४.१७ टक्के, डोमाळे अक्षय नारायण ७०.८३ टक्के, गुंजाळ निकीता बबन ७०.६७ टक्के गुण मिळविले आहे. तर विशेष म्हणजे मेडिकल क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी परीक्षा नीट परीक्षामध्ये समिधा संदिप साकुरे हिला मुंबई येथे मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून प्रवेश मिळाला आहे.

तसेच सीईटी या परीक्षेत आदित्य बंडोपंत नेहे याला ९५.६७ टक्के मिळाले असून त्यास अभियांत्रिकी महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. अगदी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ११ वी व १२ वीच्या शिक्षणासाठीची सोय नसताना शिक्षणासाठी मुलांना इतर बाहेर गावी जावे लागत होते. हि बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष बन्सी काकडे यांनी २०१६-१७ मध्ये सुरू केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातून आज विद्यार्थी मेडिकल, अभियांत्रिकीसह अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षणासाठी जात आहेत, हे मात्र अभिमानास्पद आहे.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री केदारेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पेरणे, प्रा. संभाजी माने, प्रा. गाडे, प्रा. दिघे, प्रा. बुळे, प्राध्यापिका रोकडे, प्राध्यापिका बुळे, प्राध्यापिका नलगे, प्राध्यापिका तळपे, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे