Breaking
ब्रेकिंग

दीपक शिंदे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक बहाल…

पोलीस दलातील उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त...

0 3 9 0 6 1

दीपक शिंदे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक बहाल…

पोलीस दलातील उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त…

वाळकी /  प्रतिनिधी :  दादासाहेब आगळे

गुंडेगावचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक दीपक श्रीधर शिंदे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले होते. हे पदक महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पोलीस महासंचालक माननीय शुक्ला मॅडम तसेच डाॅ.रविंद्र शिसवे कमिशनर यांंच्या शुभहस्ते देण्यात आले.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने राज्यभरातून उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव मागवले जातात. यंदाच्या निवडीमध्ये अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील सुपुत्र दीपक शिदे यांची निवड करण्यात आली आहे.
शिंदे यांची नोकरी सुमारे ३६ वर्षे झाली आहे.या सेवेच्या कालावधीत त्यांनी ८०० बक्षिसे मिळवली असून, त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांवर उल्लेखनीय कारवाई केली आहे. त्यांनी खून प्रकरणांत अनेक आरोपींना अटक केली. अंमली पदार्थांच्या कारवाईत गांजा, एमडी, कोकेन असे विविध प्रकारांचे अमली पदार्थ पकडले.तसेच दरोडा प्रयत्नात असणारे आरोपी, जबरी चोरी प्रकरणातील आरोपी, घरफोडी प्रकरणातील आरोपींना अटक करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. वाहन चोरीसंदर्भातही उल्लेखनीय तपास करत अनेक गुन्हे उघड केले, गोवा बनावटीची दारू, बेकायदेशीर शस्त्रे आणि गुटखा वाहतूक यावरही प्रभावी कारवाई केली आहे.त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना या उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाले असून या पुरस्कारामुळे त्यांना गुंडेगाव नागरिकांनी शुभेच्छा व कौतुक केले आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे