नुतन शिक्षण संस्था संचलित रा.का.मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बहादरपूर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
नुतन शिक्षण संस्था संचलित रा.का.मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बहादरपूर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी :- पंकज पाटील
पारोळा:- नुतन शिक्षण संस्था संचलित रा.का.मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बहादरपूर येथे थोर
विचारवंत,मार्गदर्शक,युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा ताईसो श्रीमती एस.के.सिसोदे मॅडम,रा.का.मिश्र विद्यामंदिराचे प्राचार्य दादासो श्री एस.बी.चौधरी सर,ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी उस्फूर्त असा सहभाग नोंदविला.त्यात विद्यार्थिनींनी उत्कृष्ट वेशभूषा तसेच राजमाता जिजाऊ यांची भूमिका तर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन तसेच पूर्ण रूपरेषा,(इ.7 क)च्या विद्यार्थ्यांनी आखली त्यांना विद्यालयाचे शिक्षक श्री एस.डी.निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.