Breaking
ब्रेकिंग

अहिल्यानगर मधील ११ कराटे प्रशिक्षक राष्ट्रीय पंच परीक्षेत यशस्वी !

आदित्य क्षीरसागर, सबील सय्यद , सरफराज सय्यद, सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन !

0 8 9 6 7 5

अहिल्यानगर मधील ११ कराटे प्रशिक्षक राष्ट्रीय पंच परीक्षेत यशस्वी !

आदित्य क्षीरसागर, सबील सय्यद , सरफराज सय्यद, सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन !

प्रतिनिधी :  संवेद वायकर

अहिल्यानगर, ता. २१ जुलै : कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या (KIO) वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक परीक्षा २०२५ मध्ये अहिल्यानगरमधील ११ कराटे प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन करत परिसराचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर रोवला आहे.

ही परीक्षा रेफ्री कमिशनच्या चेअरमन शाहीन अख्तर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. परीक्षेमध्ये सहभागी प्रशिक्षकांना लेखी चाचणी, नियमांचे सखोल ज्ञान, प्रात्यक्षिक परीक्षण, आणि मैदानातील निर्णयक्षमतेची परीक्षा अशा सर्व अंगांनी तपासले गेले.

यामध्ये रेफरी ए, रेफरी बी, जज बी, तसेच कँप प्रशिक्षक या प्रकारांमध्ये निवड झालेली असून, प्रशिक्षकांनी उत्कृष्ट गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण केली. यामुळे त्यांच्या पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून सहभागाची दारे खुली झाली आहेत.

यशस्वी प्रशिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे —
आदित्य क्षीरसागर, साहील सय्यद, सबील सय्यद, सूरज गुंजाळ, सर्फराज सय्यद, आशिष केदारी, अदिती होले, संस्कृती चव्हाण, विशाल भंडारी, सुजित हजारे आणि ओम वाघ.

या यशस्वी प्रशिक्षकांना कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हांशी भारत शर्मा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, अधिकृत बॅच व टाय प्रदान करून गौरविण्यात आले. हा क्षण प्रशिक्षकांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला.

या गौरव समारंभप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सल्लाऊद्दीन अन्सारी, उपाध्यक्ष परमजितसिंग आणि सचिव संदीप गाडे हे मान्यवर विशेष उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षकांचे कौतुक करत सांगितले की, “ही परीक्षा केवळ पात्रता नव्हे, तर ती एक शिस्त, नैतिकता, आणि कराटेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित परीक्षा आहे.”

या यशामुळे अहिल्यानगरमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी प्रशिक्षकांचे स्वागत करण्यात येत आहे. या प्रशिक्षकांचे यश भविष्यात नव्या पिढीतील कराटेकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.

एस डब्ल्यू न्यूज टीम च्या वतीने सर्वांचे मनः पुर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे