Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्री अमोलक संस्थेच्या पी. एम . मुनोत ज्युनिअर कॉलेजचे यश

सृजन पेठकर याने प्रथम क्रमांकाने मिळविले घवघवीत यश..

0 8 9 6 7 5

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्री अमोलक संस्थेच्या पी. एम . मुनोत ज्युनिअर कॉलेजचे यश

सृजन पेठकर याने प्रथम क्रमांकाने मिळविले घवघवीत यश..

प्रतिनिधी : संवेद वायकर

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन, बीड यांच्या वतीने सोमवार दि . 8 ऑक्टोबर 2025 रोजी बीड येथे 19 वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यात चि .सृजन महेंद्र पेठकर याने सुरुवाती पासूनच स्पर्धेत वर्जस्व गाजविले आणि प्रथम क्रमांकाचा मान मिळविला .

सृजन हा श्री .अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पी एम मुनोत ज्युनिअर कॉलेज चा हुशार बुद्धिबळपटू आहे .
सृजन हा अमोलक परिवाराचे, गांधी महाविद्यालयाचे श्री . महेंद्र पेठकर यांचा मुलगा आहे .

यावेळी बोलताना सृजन ने सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोबाइलचा व आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करून अभ्यासात, खेळात चांगले यश मिळवावे. त्यासाठी मी संस्थेतील सर्व वयोगटातील बुद्धिबळ खेळाडूंना निस्वार्थी भावनेने मनापासून मार्गदर्शन करून तालुका, जिल्हा पातळीवर यश मिळविण्यासाठी निश्चित पणे प्रयत्न करणार आहे . पटावरील राजा अजुन खुप लांब आहे . पटावरील सोंगट्यामधे राहुनच तिथे पोहचणार आहे असेही तो म्हणाला . बुद्धी आणि बळ एकत्रच नांदत असलेल्या चाणाक्ष आणि बळकट शरीरयष्टीच्या सृजनला पाहुन त्याच्या सर्वगुणसंपन्नतेची अनुभुती येते .

संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश भंडारी ,सेक्रेटरी हेमंत पोखरणा ,कार्याध्यक्ष कांतीलाल चानोदिया, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गोकुळदास मेहर,उपाध्यक्ष बाबुलाल भंडारी, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी ,उपाध्यक्ष अनिल झाड मुथा, उपाध्यक्ष बिपिन भंडारी, कार्यकारी मंडळ व विश्वस्त मंडळाचे संचालक तसेच अमोलक परिवारातील सर्व प्राचार्य डॉ. भंडारी सर, राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक प्रा.डॉ.जमीर सर , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पडोळे सर , विद्यालयाचे प्राचार्य शिकारे सर ,ललवाणी, सरडे बाबा, अनील पोखरणा ,आनंद पोखरणा दीपक गुगळे ,सरोदे, देसरडा,सचिन चोरडिया, गोडसे, लूनावत,कासार, वालचंद जैन, वीर, जाधव, गायकवाड,साबळे, बाळासाहेब बोकेफोड , कस्तुरे, बोंदार्डे तसेच सर्व अमोलक् परिवारातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे