Breaking
ब्रेकिंग

उजनीवरील चार प्रकल्पांविरोधात मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी-मच्छीमार एकवटले; ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको

0 8 9 6 7 8

उजनीवरील चार प्रकल्पांविरोधात मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी-मच्छीमार एकवटले; ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २५/ उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या चार प्रकल्पांसाठी तब्बल १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी नघोर्ली येथे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर त्यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यांतील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांची बैठक पार पडली.

विकासाला विरोध नाही; मात्र शेतकरी-मच्छीमारांच्या हिताकडे दुर्लक्ष नको! प्रकल्पांचे फायदे, पाण्याची गरज आणि शेती, मत्स्यव्यवसाय व पर्यावरणावरील संभाव्य परिणाम शासनाने स्पष्ट करावेत. जनतेला विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यावी, अशी भूमिका उपस्थित मान्यवरांनी मांडली.

बैठकीच्या व्यासपीठावर माजी आमदार संजयमामा शिंदे, बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे, राजेंद्र धांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, चंद्रकांत सरडे, रोहिदास सातव, तानाजी झोळ, गौरव झांजुर्णे, सुजित बागल, सुभाष अभंग, अशपाक जमादार, मानसिंग खंडागळे, उदयसिंह देशमुख, सचिन गावडे, सोमनाथ रोकडे, ॲड. जालिंदर बसळे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, नितीन खटके आणि रवींद्र वळेकर उपस्थित होते.

यावेळी ॲड. अजित विघ्ने, ताटे सर, संदीप माने, सौरभ आरकिले, अविनाश सरडे, निलेश देवकर, अक्षय यादव, नंदकुमार नगरे, सीताराम नगरे, सुभाष आबा गुळवे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.

या प्रकल्पांविरोधात जनजागृती करण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी रांजणी येथील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यांतील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.

उजनीचे पाणी, शेतकऱ्यांचे भविष्य आणि मच्छीमारांची उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी एकजुटीने लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे