Breaking
ब्रेकिंग

दिव्य दृष्टिचे दिव्यांगासाठीचे कार्य लवकरच देशपातळी वर पोहचेल : आमदार संग्राम जगताप

आर्य संगणक प्रशिक्षण विभाग व भारतातील पहिले दिव्यांग ई -सेवा केंद्राचे उद्घाटन

0 8 6 5 6 0

दिव्य दृष्टिचे दिव्यांगासाठीचे कार्य लवकरच देशपातळी वर पोहचेल : आमदार संग्राम जगताप

आर्य संगणक प्रशिक्षण विभाग व भारतातील पहिले दिव्यांग ई -सेवा केंद्राचे उद्घाटन

अहिल्यानगर : दिव्यांगाच्या दिव्यदृष्टि संस्थेमार्फेत दिव्यांगासाठीचे आर्य संगणक प्रशिक्षण विभाग व भारतातील पहिले दिव्यांग ई – सेवा केंद्र सुरू करण्याचे महत्वपूर्ण कार्य होत आहे . यातून असंख्य दिव्यांगाना स्वावलंबी व सम्मानपूर्ण जीवन जगता येणार आहे .दिव्य दृष्टिचे दिव्यांगाच्या क्षेत्रातील हे कार्य केवळ राज्यापुरतेच मर्यादित न रहाता . लवकरच देश पातळी पोहचेल आसा ठाम विश्वास आमदार संग्राम जगताप व्यक्त करत संस्थेच्या पाठीशी सदैव खंबीर पणे उभे राहणार असल्याची गवाही त्यांनी यावेळी दिली .

मार्केटयार्ड येथील हरितक्रांती बिल्डींग मध्ये दुसऱ्या मजल्या वर सुरु करण्यात आलेल्या ई -सेवा केंद्रांचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते.

लेखक, वक्ते, उ‌द्योजक एन बी धुमाळ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .

यावेळी मंचावर सीक्यूएव्हीचे ब्रिगेडिअर राजीव चावला, बँक ऑफ बडोदा चे मुख्य व्यवस्थापक देविदास पालवे , इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ विजय कदम , रोट्ररी क्लब अहमदनगर सेंट्रल चे अध्यक्ष सुनिल कटारिया , उद्योजक विजय कोथिबीरे, भाजीपाला व फळावळ अडत्यांची असोसिएशनों अध्यक्ष अशोक लाटे, अशोक शिंदे, वाहे गुरु सेवा समिती ग्रुपचे निप्पूसिंग धुपड , राकेश गुलाटी , बबलू खोसला, आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका सविता काळे , पत्रकार ज्ञानेश कुलकर्णी, हभप मंच्छिंद्र तवले महाराज , दिव्यदृष्टी दिव्यांग संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष कृष्णा तवले आदी उपस्थित होते .

दिव्यदृष्टीचे अध्यक्ष कृष्णा तवले यांनी प्रास्तावि कात दिव्यांगाच्या निवासी प्रकल्पासाठी जागा , निधी साठी समाजातील दानशुराना मदती चे आवाहन केले . तसेच समाजसेवेची आवड असणाऱ्या युवकांना स्वयंसेवक म्हणुन कार्य करण्यास पुढे यावे असे आवाहन केले .

यावेळी अजित कुलकर्णी, लक्ष्मण पोकळे , हभप मच्छिंद तवले आदी नी आपले मनोगतातून संस्थेच्या कार्याचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कार्यक्रमासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभागृह उपलब्ध करून सहकार्य दिले .उद्योजक शशी घिगे यांचे सेंटरसाठी व कार्यक्रमास विशेष सहयोग मिळाला . कार्यक्रमास उपस्थित दिव्यांगांची भोजन व्यवस्था वाहे गुरु सेवा समिती तर्फे करण्यात आली होती .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्यदृष्टीचे सुनिल बाचकर , निलेश शिदे , धवन उमरेडकर , सुभाष शिदे, अमोल चव्हाण आदी सह सर्व पदाधिकारी व संभाजी भोर , राजेंद्र फलके, अनिल परभणे , स्वयंसेवक अपेक्षा परभणे , प्रतिक्षा परभणे आदिनी विशेष परिश्रम घेतले . ज्योती तवले यांनी सूत्रसंचालन केले तर ज्ञानेश्वर ससे यांनी  उपस्थितांचे  आभार व्यक्त केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे