राहुरी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी संपन्न वर्षाभरातील कामकाजाचा पोलीस अधीक्षक यांनी घेतला आढावा
*राहुरी पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी संपन्न वर्षाभरातील कामकाजाचा पोलीस अधीक्षक यांनी घेतला आढावा*
राहुरी तालुका जावेद शेख
दि 21-1-2026 ते 24/1/2026 कालावधीत माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून राहुरी पोलीस स्टेशनची वार्षिक निरीक्षण तपासणी घेण्यात आली दिनांक 24 1 2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे व जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे भेट दिली. भेटीदरम्यान सन 2023, 2024, 2025 वर्षातील दाखल गुन्हे उघड गुन्हे याचा आढावा घेण्यात आला .
*वाहन चोरीत लक्षणीय घट*
मागील 2023 वर्षातील वाहन चोरीच्या दाखल गुन्ह्याच्या (112)तुलनेत २०२४ मधे चोरीचे दाखल गुन्ह्यांची संख्या75 ( 37.घट-)कमी झालेली दिसून आली. तसेच २०२५ मधे चोरीचे दाखल गुन्ह्यांची संख्या (52)कमी झालेली दिसून आली असून दोन वर्षात वाहन चोरीत उल्लेखनीय घट झाल्याबाबत पोलीस स्टेशन चे सांघिक कामाचे कौतुक केले.
*उल्लेखनीय प्रलंबित गुन्हे निर्गती*
पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चार्ज घेताना जानेवारी २०२४ मधील प्रलंबित गुन्ह्याची ८५० असलेली संख्या (८५%) जानेवारी २०२६ पर्यंत विशेष प्रयत्न करून दोन वर्षात २००० गुन्हे दाखल होऊनही एकूण २६०० गुन्ह्याची निर्गती करून एकूण प्रलंबित गुन्हे १६५ (१६%)वर आणले या बाबत विशेष कौतुक केले.
*एक महिन्यात गुन्हे निर्गती करणाऱ्या अमलदाराचे कौतुक*
तपासणी दरम्यान एका महिन्यात गुन्ह्याची तात्काळ निर्गती करणारे अंमलदार यांना प्रत्येकी 200/- ते 1000/ रुपये प्रमाणे बक्षीस देण्यात आले आहे .राहुरी पोलीस स्टेशन कडील 30 अंमलदारांना यांना याप्रकारे बक्षीस पोलीस अधीक्षक साहेबांकडून देण्यात आले आहे
*समन्स वॉरंट बजावणीत सुधारणा*
अजामीनपत्र वारंट मागील दोन वर्षांपूर्वी समास वॉरंट बजावणीचे प्रमाण 22 % टक्के वर होते ते आता 100 % टक्के वर गेले असल्याने न्यायालयीन कामकाजात सुधारणा होऊन व दैनंदिन कामकाज वेळेवर चालत आहे नागरिक स्वतःहून न्यायालयात हजर राहत असल्याने त्याबाबत मा.न्यायालयाने ही समाधान व्यक्त केले आहे.
*ऑपरेशन मुस्कान बाबत*
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत सन 2016 पासून ते 2025 पर्यंत 101 मुलींचा शोध घेऊन मोठी कामगिरी राहुरी पोलीस स्टेशन नी बजावली आहे याबाबत पोलीस अधीक्षक यांनी समाधान व्यक्त केले व
राहुरी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे
तसेच राहुरी पोलीस स्टेशन च्या धर्तीवर श्रीरामपूर उपविभागात राहुरी पोलीस वापरत असलेली sop इतर पोलीस स्टेशन ने वापरून मिसिंग मुलींचा शोध घेण्याबाबत निर्देश दिले.
*राहुरी पोलीस स्टेशनइमारत बांधकामाचा आढावा*
निरीक्षण दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन शासकीय इमारतीचे बांधकामाची पाहणी केली तसेच आवश्यक त्या सूचना दिलेले आहेत,
*इलेक्ट्रिक मोटरच्या शोधाबाबत डीबी पथक सूचना*
शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर चोरींच्या गुन्ह्याबाबत डीबी पथकाशी चर्चा करून इलेक्ट्रिक मोटर शोधण्याबाबत विशेष सूचना दिलेले आहेत
*प्रलंबीत मुद्देमाल निर्गती बाबत निर्देश*
तसेच पोलीस स्टेशन कडील मागील वीस वर्षापासून पडून असलेला जप्त मुद्देमाल यांचे फिर्यादीचा शोध घेऊन मूळ मालकाला सदर मुद्देमाल परत करण्याबाबत कारकून व पोलीस निरीक्षक यांना सूचना दिले आहेत
*गुन्हे शबितीबाबत सूचना*
सेशन कमिट ट्रायल गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांना ब्रीफ करण्याबाबत दुय्यम अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना सूचना देऊन जास्तीत जास्त केसेस शाबीत होतील याकडे लक्ष देण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी सूचना दिलेले आहेत
*व्यापारी असोसिएशन व पोलीस पाटील यांच्याकडून सन्मान व विविध विषयावर चर्चा*
सदर भेटी दरम्यान व्यापारी असोशियन राहुरी यांनी मा. पोलीस अधीक्षक सो यांची भेट घेतली तसेच ऑपरेशन मुस्कान बाबत पोलीस अधीक्षक यांचा सन्मान केला तसेच राहुरी शहरातील सीसीटीव्ही बसण्याबाबत असणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून सहकार्य करण्याबाबत आवाहन केले. राहुरी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने ऑपरेशन मुस्कान बाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे मा.जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर मा. संजय ठेंगे पोलीस निरीक्षक यांचा सन्मान करण्यात आला आहे.
*पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या चर्चा व अडचणी तक्रारी जाणून घेतल्या*
निरीक्षण दरम्यान पोलीस अधीक्षक साहेबांनी राहुरी पोलीस स्टेशनचा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या भविष्यात राहुरी पोलीस स्टेशन येथे चांगल्या दर्जेदार निवासस्थानासाठी शासन स्तरावर पाठपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. एकूण गुन्ह्यांच्या प्रमाणात उपलब्ध कमी मनुष्यबळामध्ये पोलीस स्टेशनचे कामकाज चांगल्या प्रकारे झालेले आहे याबाबत समाधान व्यक्त केले.


