Breaking
ब्रेकिंग

गाळेधारकांकडून अवाजवी भाडे आकारणी रद्द करा ;  व्यापारी आघाडीचे उपमहापौर व सभापतींना निवेदन

0 8 6 5 3 0

गाळेधारकांकडून अवाजवी भाडे आकारणी रद्द करा ;  व्यापारी आघाडीचे उपमहापौर व सभापतींना निवेदन

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

नगर -भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष – व्यापारी आघाडी महेश गुगळे यांच्या सह आज व्यापाऱ्यांनी उपमहापौर धनंजय जाधव व स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे यांना अहिल्यानगर महानगरपालिकाने जुने दाणे डबरा व गंजबाजार, गाळे भाडे वाढ रद्द करा या मागणीचे निवेदन दिले . यावेळी नगरसेवक निखिल वारे,महेश लोंढे ,गोरख पडोळे,संजय ढोणे, भाजपा उपाध्यक्ष गोपाल वर्मा उपस्थित होते तर व्यापारी आघाडी पदाधिकारी अध्यक्ष महेश गुगळे,हर्षल बोरा,नीरज राठोड,रुपेश वर्मा,सुरेश लालबागे,लक्ष्मीकांत तिवारी,संजय कांगडा, प्रशांत डहाळे,महेंद्र नांदुरकर,देवेंद्र दुधाळे हेमंत पवार,प्रशांत बुऱ्हाडे,जुना दाणे डबरा व्यापारी संघटनाचे अरुण पारेख,प्रकाश बोरा,विजय बोंद्रे ,राजेंद्र गांधी,संतोष भटेवरा,किरण राका,भाऊसाहेब पांढरे,धीरज पोखरणा,विजय गांधी,प्रवीण सुराणा,वेणुगोपाल झंवर आदी उपस्थित होते

निवेदनात म्हटले आहे कि अ.नगर महानगरपालिकेच्या गाळेधारकांकडून घटनाबाह्य अवाजवी भाडे आकारणी झालेली असून सदर आकारणी रद्द करण्यात यावी तसेच गाळेधारकांचे मालक महानगरपालिका असताना गाळे धारकांकडून घरपट्टी व इतर कर घेवू नये,दि. ६ नोव्हेंबर २०२३ चे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, असाधारण क्र. ४१८ नुसार नवीन भाडे आकारणी करण्यात यावी,सन २०१६-१७ साली जे मुळ भाडे आकारणी होती व त्यानंतर करण्यात आलेले भाडे वाढ ह्यात फार मोठी तफावत आहे व ती दुरुस्त करण्यात यावी.

दि. २०/०७/२०१८ रोजी झालेल्या महासभेत प्रस्ताव क्र. ३ प्रस्तावाचा विषय गाळे धारकांचे भाडे वाढ रद्द करणेबाबत सविस्तर चर्चा होऊन सदरचा निर्णय झाला असताना त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही,सदर गाळेधारक अंदाजे ५० वर्षापुर्वीचे जुने आहे, त्याचाही विचार करावा,तत्कालीन नगरपालिकेने सदर गाळेधारकांना खुली जागा दिली असता प्रत्येक गाळा धारकाने सदर गाळे स्वखर्चाने बांधून घेतले असल्याने त्यांना फक्त खुलीजागा भाडे आकारणी करण्यात यावी तरी आपण सदर विषय गांभिर्याने घेऊन सामान्य गाळे धारकांची परिस्थिती जाणुन योग्य तो निर्णय आपण घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे