Breaking
ब्रेकिंग

रिक्त ग्रामपंचायत जागासाठी पोटनिवडणूक; ७ पासुन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

0 8 6 5 3 0

रिक्त ग्रामपंचायत जागासाठी पोटनिवडणूक; ७ पासुन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :-अमळनेर येथील विविध कारणामुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत जागासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अंतुर्ली-रजाणे आणि चोपडाई येथील लोकनियुक्त सरपंच पदासह विविध गावामधील सदस्य पदांचा समावेश आहे. ७एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असून राजकीय हालचालीना वेग आला आहे.
             सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड
अंतुर्ली – रजाणे आणि चोपडाई या दोन महत्त्वाच्या ग्रामपचायतीच्या सरपंचानी राजीनामा दिल्यानेही पदे रिक्त झाली होती. विशेष म्हणजेः अतुर्ली-रजाणेः येथील सरपच पद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी आहे. चोपडाईः येथील सरपच पद ‘अनुसूचित जमाती’ एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे.
        या दोन्ही ठिकाणी आता थेट जनतेतून नवीन सरपंचाची निवड केली जाणार आहे. केवळ सरपंचच नव्हे, तर तर अनेक अनेक गावातील सदस्य पदे देखील विविध कारणामुळे रिक्त आहेत, तिथेही आता निवडणूक पार पडणार आहे: मुंगसेः प्रभाग ३ (एसटी) मध्ये पूर्वी कोणीही अर्जन केल्याने आणि प्रभाग १ मधील उमेदवाराचे निधन झाल्याने पुन्हा निवडणूक होत आहे.

      नंदगाव लड़गावः प्रभाग १ मधील (सर्वसाधारण स्त्री) उमेदवार निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. डागर बुद्रुकः प्रभाग १ (सर्वसाधारण स्त्री) आणि प्रभाग ३ (सर्वसाधारण) मधील सदस्याच्या निधनामुळे दोन्ही पदे रिक्त आहेत. चोपडाईः सरपच पदासोबतच प्रभाग २ (सर्वसाधारण) आणि प्रभाग ३ (एससी) मधील सदस्यानी राजीनामा दिल्याने या जागासाठीही मतदान होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे