Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुस्तीपट्टू आश्लेषा बागडे हिने कजाकिस्तान येथे एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत मिळवले ब्रॉझ पदक

आश्लेषा बागडेने कुस्ती स्पर्धेत मिळवलेले यश अभिमानास्पद:- रश्मी दीदी बागल-कोलते

0 7 9 9 5 4

आश्लेषा बागडेने कुस्ती स्पर्धेत मिळवलेले यश अभिमानास्पद:- रश्मी दीदी बागल-कोलते

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १५/ करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुस्तीपट्टू आश्लेषा कल्याण बागडे हिने कजाकिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ब्रॉझ पदक मिळवले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयात आज यशवंत परिवाराच्या वतीने आश्लेषाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल बी पाटील हे होते.

यावेळी विचारपीठावर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल – कोलते, मिलिंद फंड सर प्राचार्य, डॉ. अनिल साळुंखे, संभाजीराव किर्दाक सर, कल्याण बागडे व सत्कारमूर्ती आश्लेषा बागडे हे उपस्थित होते.

यावेळी रश्मी दीदी बागल म्हणाल्या की आश्लेषा बागडेने कुस्ती स्पर्धेत मिळवलेले यश कौतुकास्पद असे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कुस्ती स्पर्धेत यश मिळवू शकते हे तिने दाखवून दिले. यावेळी रश्मी दीदी बागल – कोलते यांनी आश्लेषास प्रोत्साहनपर दिगंबरराव बागल प्रतिष्ठानच्या वतीने ५१००० हजार रुपये देण्यात आले.

याप्रसंगी यशवंत या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी विद्यापीठाच्या वार्षिक अंक स्पर्धेत ललित गद्यात्म विभागात हिंदी विभागाचा विद्यार्थी अमित सरवदे यास तृतीय क्रमांक मिळाला. याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम काळे यांनी केले तर सूत्रसंचालन मुक्ता काटवटे मॅडम यांनी केले. आभार प्रा. नितीन तळपाडे यांनी मानले. या कार्यक्रमास यशवंत परिवारातील सर्व सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे