Breaking
ब्रेकिंग

झरे गावातील यात्रेमध्ये अश्लील कार्यक्रम व ध्वनी प्रदूषणास तात्काळ बंदी घाला:- सरपंच मंजुश्री मुसळे यांचे डी. वाय. एस. पी. यांना लेखी निवेदन

0 7 6 9 4 3

झरे गावातील यात्रेमध्ये अश्लील कार्यक्रम व ध्वनी प्रदूषणास तात्काळ बंदी घाला:- सरपंच मंजुश्री मुसळे यांचे डी. वाय. एस. पी. यांना लेखी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३१/ करमाळा तालुक्यातील झरे गाव येथे दिनांक २ एप्रिल रोजी होणारी जोतिबाची यात्रा ही धार्मिक व पारंपरिक स्वरूपाची असून गावाच्या श्रद्धेचा अत्यंत संवेदनशील विषय आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून या यात्रेमध्ये उघडपणे अधील नृत्य, अधील गाणी आयोजित केले जात आहेत. सदर प्रकार सार्वजनिक ठिकाणी उघडपणे घडत असून ते समाजातील नैतिक मूल्ये, महिलांचा सन्मान व सार्वजनिक शिस्त यांना बाधा आणणारे आहेत. तसेच DJ च्या माध्यमातून प्रचंड ध्वनीप्रदूषण निर्माण केले जात असून, यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

वरील प्रकार हे भारतीय दंड संहिता तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणारे असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे आहेत. या सर्व प्रकारा विषयी चर्चा करून प्रहार शेतकरी संघटनेचे ता. उपप्रमुख सोमनाथ जाधव यांनी घरे गावचे नूतन विद्यमान सरपंच मंजुश्री मयूर मुसळे यांच्याकडे हा सर्व प्रकार थांबवण्याची मागणी केली होती. सदर मागणीची दखल घेत सरपंच मुसळे यांनी डीवायएसपी अंजना कृष्णा मॅडम यांना लेखी निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात खालील बाबींची मागणी केलेली आहे.

अश्लील नृत्य व अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तात्काळ परवानगी नाकारण्यात यावी.

अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

DJ व ध्वनीप्रदूषणावर कायदेशीर मयदेिनुसार कडक नियंत्रण ठेवण्यात यावे.

यात्रेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू देवु नये याची दक्षता घ्यावी.

सरपंच मुसळे यांनी निवेदनात या सर्व बाबीकडे तात्काळ व गंभीरतेने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची डी वाय एस पी यांना विनंती केली आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे