संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयास कुर्डूवाडी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अतुल मोहिते साहेब यांची सदिच्छा भेट
संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयास कुर्डूवाडी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अतुल मोहिते साहेब यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०३/ कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालया मध्ये कुर्डूवाडीच्या पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री अतुल मोहिते साहेब पोलीस निरीक्षक यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे सर यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्याबरोबर श्री लोंढे साहेब पोलीस उपनिरीक्षक हे देखील उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला.
श्री मोहिते साहेब यांनी प्रशालेतील विविध उपक्रम, गुणवत्ता, प्रशालेतील सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्मिन वाघमोडे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी इं. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन श्रीकांत सावंत यांनी केले. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे सर, कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे सर यांनी कौतुक अभिनंदन केले.



