Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करमाळा शाखेच्या वतीने “फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक दिवाळीस” उस्फुर्त प्रतिसाद

0 7 6 9 4 3

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करमाळा शाखेच्या वतीने “फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक दिवाळीस उस्फुर्त प्रतिसाद

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका करमाळा या शाखेच्या वतीने “फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक दिवाळी ” साजरी करण्यात आली. करमाळा येथील अनेक शाळा कॉलेज महाविद्यालय येथे हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

करमाळा येथील नगरपरिषद मुला मुलींची शाळा नं. १, शाळा नं. ४, कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय, गिरधरदास देवी विद्यालय, दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, प्रतापसिंह मोहितेपाटील महाविद्यालय करमाळा या शाळांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करमाळा शाखेचे कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके, यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अंनिस करमाळा तालुका अध्यक्ष गणेश करे पाटील, सचिव संजय हंडे, जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य नागेश माने, जिल्हा सचिव अनिल माने, अंनिसचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र माने, रामचंद्र बोधे, गजानन बाबा ननवरे, बाळासाहेब दुधे, संतोष माने, संभाजी खूळे, डॉ. आप्पासाहेब लांडगे, संतोष कांबळे, सुनील गायकवाड, अशोक यादव, राजेंद्र साने, अजित कणसे, सुधीर माने, सागर माने, अँड. सचिन हिरडे, कवी प्रकाश लावंड, कवी नवनाथ खरात, कवी खलील शेख, सहाय्यक कृषीअधिकारी टी. एल. चव्हाण यांनी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता दिलेल्या आव्हानास सहभागी सर्व शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

यामध्ये कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव, उप मुख्याध्यापक दत्तात्रय भस्मे, संतोषकुमार अंकुशखाने, विशाल लष्कर, दगडे मॅडम, मांगले मॅडम.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक लक्ष्मण राख, पल्लवी टोणपे, सुवर्णा कांबळे, रूपाली साळुंके, त्रिवेणी मोरे, निलेश सूर्यवंशी.

गिरीधरदास देवी विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी जगताप, सुहास गलांडे, जयवंत नरतोडेकर, राजेंद्र चिखले, जितेंद्र शिंदे, चंद्रहास खटके, अरुण नेटके, दत्तात्रय पवार, अनिता कांबळे, शितल गलांडे.

प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण देशमुख, अमोल गायकवाड, ज्ञानदेव भोसले, सोमनाथ जाधव, नाईकनवरे मॅडम.

दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज चे मुख्याध्यापक हनुमंत पाटील, निसर्गप्रेमी शिक्षक कल्याणराव साळुंके, नगरपरिषद शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका सुनंदा माने, वैशाली जगताप, आशा अभंगराव, सुनिता शितोळे, धनश्री उपळेकर, अश्विनी ठाकरे, सुषमा केवडकर, सुरेश कोळी, लालासाहेब शेरे.

नगरपरिषद शाळा नं ४ च्या मुख्याध्यापिका चंद्रकला टांगडे, मुकुंद मुसळे, विक्रम राऊत, अर्चना ताटे, साळुंखे आदींचे सहकार्य लाभले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे