Breaking
ब्रेकिंग

ठराव झालेल्या घरपट्टीवरील व्याजात सूट कधी देणार ?; पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करा:- विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे

0 7 9 7 8 7

ठराव झालेल्या घरपट्टीवरील व्याजात सूट कधी देणार ?; पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करा:- विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा:- दि. ०९/ करमाळा शहरातील मालमत्ताधारकांच्या घरपट्टीवरील व्याजावर सूट मिळावी म्हणून नगरपालिकेत सर्वपक्षीय सदस्यांच्या सहयोगातून ठराव मंजूर करण्यात आला आहे. याला अनेक महिने उलटून देखील अद्याप या ठरावाची अंमलबजावणी का केली जात नाही ? याचा जाब मुख्याधिकारी यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विचारला आहे. तसे लेखी निवेदन विरोधी पक्षाकडून नगरपालिका प्रशासनास देण्यात आले आहे.

सदर ठराव प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अंमलात आणला जात नसून, यामुळे शहरवासियाना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. तरी लवकरात लवकर या ठरावाची अंमलबजावणी करावी. तसेच शहरातील विविध नाल्यांमध्ये कचऱ्याची वाढ झाली आहे. काही ठिकाणी ठेकेदारांना कामे दिली आहेत तरीही ती कामे केली गेली नाहीत. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेविका अश्विनी कांबळे-अब्दुले, सुवर्णा आलाट, सोफिया कुरेशी इं. उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे