सार्थक मकरंद वनारसे अबॅकस स्पर्धेत सोलापुर जिल्ह्यात प्रथम

सार्थक मकरंद वनारसे अबॅकस स्पर्धेत सोलापुर जिल्ह्यात प्रथम
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ चि. सार्थक मकरंद वनारसे रा. करमाळा या १० वी च्या विद्यार्थाने अबॅकस स्पर्धेत यश मिळवून सोलापुर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन करमाळ्याचे व शिपी समाजचे नावलौकीक केले आहे. या निमित्त त्यांचा सत्कार व अभिनंदन श्रीसंत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आले.
या वेळी रामचंद्र बोधे गुरुजी, चंद्रकांत चुंबळकर, अशोक गाठे, पांडुरंग वडे, राजेंद्र गानबोटे, सागर वडे, रविंद्र वनारसे इं. उपस्थितीत होते.
या वेळी सार्थक वनारसे चे आजी, आजोबा, आई, वडिल, व पूर्ण वनारसे परिवार आनंदीत असल्याचे निदर्शनास आले. सत्कारास उत्तर देताना सार्थक वनारसे भावुक होताना हा सत्कार म्हणजे श्रीसंत नामदेव शिंपी समाज परिवाराचा असल्या कारणाने आनंदीत आणि प्रोसाहीत झाल्याचे बोलून दाखाविले. अशी माहिती श्री संत नामदेव शिंपी समाजाचे सचिव विश्वस्त पांडुरंग वडे यांनी दिली आहे.


