Breaking
ब्रेकिंग

करमाळा शहराचा सर्वांगीण विकास हवा असेल तर करमाळा नगरपालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्यक:- जगदीश अग्रवाल (प्रभाग क्रमांक ६ चे भाजपचे उमेदवार)

0 7 6 9 4 3

करमाळा शहराचा सर्वांगीण विकास हवा असेल तर करमाळा नगरपालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्यक:- जगदीश अग्रवाल (प्रभाग क्रमांक ०६ ब चे भाजपचे उमेदवार)

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ करमाळा शहरातुन प्रभाग क्रमांक ६ ब मधून उभे राहिलेले भाजपचे उमेदवार जगदीश अग्रवाल यांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून त्यांनी जनतेला असा विश्वास दिला आहे की जर करमाळा नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर करमाळा शहराचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. करमाळा शहरात फक्त समस्या आणि अडचणी आहेत. विकास मात्र शून्य आहे आणि जर करमाळा शहराला सर्व समस्येतून मुक्त व्हायचं असेल तर, करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपची सत्ता नगरपालिकेत गरजेचे आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता भारतीय जनता पार्टीला एक वेळ संधी द्यावी नक्कीच करमाळा तालुक्याचा विकास झाल्या वाचून राहणार नाही. असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले. 

पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले आज करमाळा शहरांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. पिण्याचा पाण्यासाठी करमाळा शहरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि आणखीनही करावा लागत आहे. करमाळा शहरातील घाणीचे साम्राज्य त्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य, सुलभ व स्वच्छ शौचालय, भटक्या जनावरांचा बंदोबस्त अशा विविध समस्या करमाळा शहरांमध्ये आहेत. जर या सर्व समस्यांचे निवारण करायचे असेल तर मला व माझ्या पक्षाला एक वेळ संधी द्या असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

जगदीश अग्रवाल हे भाजपाचा एक कार्यकर्ता ते भाजप करमाळा शहराध्यक्ष पदापर्यंत काम करताना जगदीश अग्रवाल यांनी समाजसेवेला प्रथम प्राधान्य दिले. यांनी केशव प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर समाजसेवेचे कार्य केले आहे. जसे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, बेरोजगारांना रोजगार, कोरोना काळात गरजवंतांना मदत असे वेगवेगळ्या प्रकारे ते समाजसेवा करत आले.

आज जर जनतेने आम्हाला एक वेळ संधी दिली तर आम्ही त्या संधीचे सोने करून दाखवु व या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू. करमाळा शहरातील सर्व प्रश्न आपण मार्गे लावू. जर करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी हवा असेल तर भाजपची सत्ता आल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही तो सत्तेत आल्यानंतर आणणार आणि करमाळा शहराचा विकास करूनच दाखवणार असे हे अग्रवाल यावेळी म्हणाले. करमाळा शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून करमाळा शहरातील सर्व समस्यांचे निवारण व सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असु असे आश्वासन जगदीश अग्रवाल यांनी नागरिकांना दिले आहे.

जगदीश अग्रवाल:- भाजप शहराध्यक्ष 

     प्रभाग क्रमांक ०६ ब चे भाजपचे उमेदवार

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे